Mon. Dec 23rd, 2024

वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवेच्या घेतलेल्या शपथेचे पालन करणे महत्वाचे-डॉ.अशोक मुंडे

Spread the love

रुग्णसेवा हाच आमचा धर्म आहे आणि तोच धर्म मी मानतो-डॉ.माधव विभुते

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.माधव विभुते यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शैक्षणिक कार्यकाळ पुर्णत्वास आल्यानंतर पदवी घेतांना प्रत्येक डॉक्टर रुग्णसेवीची शपथ घेतो.त्यामुळे रुग्णसेवेच्या घेतलेल्या शपथेचे पालन करणे महत्वाचे आहे.नव्हे तर त्या शपथ पालनातून निस्वार्थ सेवाभाव जपलाच पाहिजे,असे मनोगत स्वेच्छा सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंडे यांनी दि.२६ जानेवारी रोजी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आयोजित त्यांच्या व वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव विभुते यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.

भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक मुंडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.माधव विभुते यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.या दोघांनीही सदरील रुग्णालयात कर्तव्यावर असतांना अतिशय चांगली व उल्लेखनीय रुग्णसेवा बजावली.त्यांच्या उत्तम सेवाकार्याची दखल घेऊन सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने दि.२६ जानेवारी २०२३ रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे त्यांच्या सन्मानार्थ सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नुतन वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनंत चव्हाण हे होते.तर वैद्यकीय अधिकारी अस्थिरोग तज्ञ डॉ.नितीन कळसकर,स्त्रीरोग डॉ.आर्शिया शेख,बालरोग तज्ञ डॉ.सागर रेड्डी,दंत शल्यचिकित्सक डॉ.राजाराम कोळेकर व संपादक उत्तम बाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रुग्णालयातील डॉ.विजया किणीकर,डॉ. मुद्दशिरोद्दीन,आरबीएसके वैद्यकीय अधिकारी डॉ. व्यंकटेश टाकळकर,डॉ.अविनाश गुंडाळे,डॉ.ज्योती यन्नावर,डॉ.अपर्णा जोशी,डॉ.गणेश जंगीलवाड,आरोग्य सहायक सत्यजीत टिप्रेसवार,व्यंकटेश पूलकंठवार, औषधनिर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे,संदीप ठाकूर, गिरी रावलोड,मल्हार मोरे,आरोग्य कर्मचारी पांडूरंग तमलवाड,नामदेव कंधारे,प्रदीप गोदने,विठ्ठल मोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मनोज पांचाळ,अत्रीनंदन पांचाळ, जाहेद अल्ली,अधिपरिचारिका राजश्री ब्राह्मणे,जिजा भवरे,सविता ताटेवाड,माठोरे,डवरे,छाया बोडेवार, प्रियंका बक्केवाड,मुक्ता गुट्टे,सरस्वती दिवटे,भालेराव, माया आडे,जोगदंड,समुपदेशक सुरेश डुमलवाड, गणेश गोदाम,रामराव जाधव,इंदल चव्हाण,दिनेश लोट,रायजदे व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम बाबळे,उपाध्यक्ष आर.के.कदम, पदाधिकारी विजय चिंतावार,विठ्ठल सुरलेकर,शुभम नर्तावार,बालाजी कदम पाटील यांसह आदींनी उपस्थित राहून सेवानिवृत्त डॉ.अशोक मुंडे आणि डॉ.माधव विभुते यांचा यथोचित सत्कार करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच नुतन अधीक्षक डॉ.अनंत चव्हाण यांचे स्वागत करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ.नितीन कळसकर,डॉ.आर्शिया शेख,डॉ. सागर रेड्डी,डॉ.राजाराम कोळेकर,डॉ.विजया किणीकर, सुरेश डुमलवाड,संपादक उत्तम बाबळे यांसह आदींनी सेवापुर्ती गौरव सोहळ्यास अनुसरुन मनोगत व्यक्त केले व गौरव मुर्ती उभयंतांना ही उत्तम आरोग्य,उदंड आयुष्य आणि पुढील सेवाकार्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.तर गौरवमुर्ती म्हणून बोलतांना डॉ.माधव विभुते म्हणाले की,डॉक्टरांनी मी कोणत्या जाती,पंथ,धर्माचा आहे व आपल्या समोर येणारा रुग्ण ही यातील कोण आहे? हे न पाहता उपचार सेवा बजावली पाहिजे.कारण रुग्णसेवा हाच आम्हा प्रत्येक डॉक्टरचा धर्म आहे आणि मी हा धर्म आयुष्याच्या शेवटपर्यंत मानत राहिल.असे ते म्हणाले.

तसेच गौरव सोहळ्यास उत्तर देताना गौरव मुर्ती डॉ. अशोक मुंडे पुढे म्हणाले की,आपल्या कुटूंबियांच्या जबाबदारीसह रुग्णांना ही उपचार सेवा देणे हे प्रत्येक डॉक्टरांचे कर्तव्य आहे.परंतू खासगी असो वा सरकारी आरोग्य सेवेत असो उपचार सेवा बजावतांना केवळ अर्थार्जनास महत्त्व देणे चुकीचे आहे.रुग्णांची पिळवणूक करुन कमविलेले पैसे अंगी लागतीलच असे नाही,कारण पत्नीसह मुलाबाळांचे प्रेम,समाधान मिळेलच असे ही नसते व त्या पैशामुळे मुले जर चुकीची निघाली तर त्या मिळकतीस काय करावे ? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.म्हणून रुग्णसेवेतून होणाऱ्या अर्थार्जनापेक्षा निस्वार्थ केलेल्या रुग्ण सेवाभावातून खुप समाधान मिळू शकते.यामुळेच मी अर्थार्जनापेक्षा निस्वार्थ रुग्णसेवेला अधिकचे महत्व देतो,आपण सर्वांनी देखील हे करावे,असेही ते म्हणाले. यानंतर अध्यक्षीय समारोप डॉ.अनंत चव्हाण यांनी केला.तर या सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सत्यजित टिप्रेसवार यांनी केले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !