स्व.बाळासाहेब ठाकरे यांना भोकर शिवसेनेकडून अभिवादन!
भोकरमध्ये शिवशक्ती भिमशक्तीचा जल्लोष…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका संपर्क कार्यालयात व तहसिल कार्यालयाजवळील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मार्गावर येथे जयंती निमित्त स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दि. २३ जानेवारी २०२२ रोजी भोकर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका संपर्क कार्यालयात बहुसंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी जेष्ठ शिवसैनिक शिवाजी पाटील किन्हाळकर,उपतालुकाप्रमुख सतिश देशमुख, भोकर तालुका प्रमुख माधव पाटील वडगावकर, भोकर शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार,माहिला तालुका प्रमुख आनंदाबाई चुनगुरवाड,सुभाष नाईक,राजु पोगरे, गंगाधर महादावाड, साहेबराव भोंबे,सुनिल चव्हाण,तेलंग,परमेश्वर राव,मारोती पवार देवठाणकर,सविता गायकवाड,गिता पिटलेवाड,राणी पहेनकर, रेखा तमलवाड,सविता हैबते,सविता ढुमने,सविता जाधव, अर्चना जंगवाड,शोभा भाबळे,अनिता जक्कलवाड,अनुसया उलगुलवाड, रंजना दिवटेवाड,अहिल्याबाई चैतरवाड,चक्रवार,खंडेलोट,अर्चना जाधव यासह आदींची उपस्थिती होती.
भोकरमध्ये शिवशक्ती भिमशक्तीचा जल्लोष…
हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाच्या मंगल औचित्याने दि.२३ जानेवारी २०२३ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन घाडीच्या युतीचा धाडसी निर्णय घेतला.यामुळे शिवशक्ती व भिमशक्ती च्या युतीने महाराष्ट्रातील राजकीय पटलावर एका नुतन समिकरणाने मोठी बळकटी निर्माण झाली आहे.ही बाब अतिशय आनंदाची असल्याने दि.२४ जानेवारी २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,भोकर येथे तालुक्यातील शिवशक्ती आणि भिमशक्तीने ढोलताशाच्या गजरात मोठी आतिशबाजीने जल्लोष साजरा केला.
या जल्लोषात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सतिश देशमुख,भोकर तालुका प्रमुख माधव पाटील वडगावकर,सुभाष नाईक,प्रदिप दोऊलतदार,संतोष आलेवाड,रमेश महागवकर, आनंदाबाई चुनगुरवाड,परमेश्वर राव, आनंद पाटिल हस्सापुरकर,राहुल पाटिल कोंडलवार,श्याम वाघमारे,चंद्रकांत बरबडे,यांसह आदी शिवसैनिक,तर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनिल कांबळे,जेष्ठ नेते एल.ए. हिरे,सुभाष तेले,फुगले,माणिक जाधव,शाहीर बाबूराव गाडेकर, राजू लांडगे यांसह आदींचा समावेश होता.