Mon. Dec 23rd, 2024

सहकार्यातून काम केल्यास गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनू शकते-अमर आयलवाड

Spread the love

हाळदा येथे आमचा गाव आमचा विकास अभियान कार्यशाळा संपन्न

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : प्राधान्य क्रमाने विकासाच्या बाबी पूर्णत्वाला नेण्यासाठी १४ वा व १५ वा वित्त आयोग यातील आराखड्या प्रमाणे निधीचा उपयोग करून सर्वांच्या सहकार्यातून काम केल्यास आपले गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनू शकते असा आशावाद यशाचे प्रशिक्षक अमरसिंह आयलवाड यांनी व्यक्त केला.तालुक्यातील हाळदा येथे दि.२४ जानेवारी रोजी पंचायत समिती भोकर च्या वतीने आमचा गाव आमचा विकास राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा सन २०२३-२४  गणस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ. सुमनबाई माधवराव नागमोड यांनी केले.तर यशदाचे प्रशिक्षक अमर आलवाड,प.स.चे विस्तार अधिकारी एस.टी.शेटवाड,ए.एल.मादसवार, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव वडजे,पत्रकार बालाजी नार्लेवाड यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना यशदाचे प्रशिक्षक अमर आयलवाड पुढे म्हणाले की,ग्राम विकासाच्या संकल्पना सरपंचांनी प्रत्यक्षात कशा उतराव्यात याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,आपल्या गावच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी विकास आराखडा आखावा.या आराखड्यात आरोग्य,कृषि,शिक्षण, विद्युत,महसूल,पाणी,अंगणवाड्या आदी विविध विभागातील जबाबदार कर्मचाऱ्यांना एकत्रित घेऊन त्यांच्या गरजेनुसार विकासाचा आराखडा बनवावा व प्राधान्य क्रमाने विकासाच्या बाबी पूर्णत्वाला नेण्यासाठी १४ वा व १५ वा वित्त आयोग यातील आराखड्या प्रमाणे निधीचा उपयोग करून सर्वांच्या सहकार्यातून काम केल्यास आपले गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनू शकते असा आशावाद व्यक्त केला.तशेच जीपीडिपी आराखड्या बाबद सविस्तर माहिती देवुन बंधीत व अबंधीत क्षेत्रावर योग्य निधीचा उपयोग करून गावाची सर्वांगीण प्रगती साधता येऊ शकते असे ही ते म्हणाले.

या कार्यशाळेचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव वडजे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी सरपंच बालाजी नार्लेवाड यांनी मानले.संपन्न झालेल्या कार्यशाळेस हाळदा व पिंपळढव गणातील २२ गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रा.प.सदस्य,ग्रामसेवक मंडळी,मुख्याध्यापक,शिक्षक वृंद,आरोग्य सेविका,अंगणवाडी कार्यकर्त्या,आशा वर्कर आदिसह विविध कार्यालयाचे कर्मचारी मोठ्या उपस्थित होते.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रतिनिधी माधवराव नागमोड,उपसरपंच गजानन करपे,ग्रामसेवक संतोष सीतावार,चेअरमन दत्तराव अक्कलवाड,ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारीवृंद, आदिसह अनेकांनी आपले योगदान दिले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !