संस्कार इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : अगदी बाल वयात कमाईचे सुत्र अवगत व्हावे या उद्देशाने बाल विद्यार्थ्यांना ‘खरी कमाई’ धडे गिरवित आनंदोत्सव साजरा करता यावा या अनुषंगाने येथील संस्कार प्रि-प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे दि.७ जानेवारी रोजी बाल आनंद नगरी मेळावा उत्साहात संपन्न झाला.
संस्कार प्रि-प्रायमरी इंग्लिश स्कूल ही अतिशय कमी वेळात नाव रुपाला आलेली इंग्रजी माध्यम शाळा असून या शाळेत खरी कमाई या उपक्रमांतर्गत बाल आनंद नगरी मेळावा भरवण्यात आला होता.या मेळाव्याचे भोकर येथील अभ्यासू पत्रकार सुधांशू कांबळे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी संस्थाचालक रूपाली भास्कर जाधव, आनंदराव ढवळे चिंचाळकर,प्राचार्य अनिल शितोळे, संस्थेचे कार्यवाह अभिजीत घुगे आदींची उपस्थित होती.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रभावामुळे मुलांच्या मनामध्ये जी अनामिक भिती तयार झाली होती,ती दूर करण्यासाठी,मुलांना एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण अनुभव यावा तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा,प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारज्ञानाचे शिक्षण मिळावे यासाठी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये फनी गेम्स,खाऊ गल्ली,सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे मौज मजा,मस्ती,धमाल करण्यात आली. चिमुकल्यानी विविध खाऊचे स्टॉल लावून खाऊची विक्री केली.विद्यार्थ्यांनी स्टॉल वर ठेवण्यात आलेल्या खाऊचा मनमुराद आनंद घेतला.
या बाल आनंद मेळाव्यासाठी प्राचार्य,अनिल शितोळे, गंगा पुरे,सविता चिवटे,मनीषा नारलेवड,सोनू तोटेवड, मुस्कान शेख,सुनीता आणारे आदी शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी प्रयत्न केले.यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.