भोकर तालुक्यातील आगामी निवडणूका ताकदीने लढवू व जिंकू-व्यंकटराव गोजेगावकर
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : देश व राज्यात अनेक लोकोपयोगी विकासात्मक योजना आपले सरकार राबवित असल्याने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत जनतेनी मोठा विश्वास दर्शविला आहे.त्यामुळेच या निवडणूकीत भाजपा जागा जिंकण्यात क्रमांक एकवर आहे.जिल्हा व भोकर तालुक्यातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे आपल्या सोबत असल्यामुळे तालुक्यातील आगामी सर्व निवडणूका आपण पुर्ण ताकदीने लढवू व जिंकूही,असे प्रतिपादन भाजपाचे नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी व्यक्त केले.ते भोकर येथे दि.२९ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या बुथ प्रमुख,शक्तीकेंद्र प्रमुखांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
स्वा.से.भुजंगराव पाटील किन्हाळकर कृषी विद्यालय, भोकर येथे दि.२९ डिसेंबर २०२२ रोजी भाजपाचे नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली भोकर तालुक्यातील भाजपा कार्यसमिती बुथ प्रमुख,शक्तीकेंद्र प्रमुख यांसह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी संघटन मंत्री गंगाधरराव जोशी, जिल्हा सरचिटणीस तथा पालक लक्ष्मणराव ठकरवाड, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख, विद्यार्थी आघाडीचे अमोल ढंगे,सोशल मिडिया जिल्हा संयोजक संजीव पांचाळ,जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी सुरकुंठवार,प्रदेश का.का.सदस्य प्रकाश मामा कोंडलवार,सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समिती संचालक गणेश पाटील कापसे,राजू अंगरवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्रीकांत किन्हाळकर,भाजपा भोकर शहराध्यक्ष विशाल माने,हरिभाऊ चटलावार, अर्शद शेख यांसह महिला पदाधिकारी व आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या आढावा बैठक प्रसंगी,गंगाधरराव जोशी,ॲड. किशोर देशमुख,लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी बैठकीस अनुसरुन यथोचित मार्गदर्शन केले.तर भोकर तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर यांनी पक्षाचा कार्य आढावा सादर केला.तसेच यावेळी पक्ष वाढीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बुथ प्रमुख,शक्तीकेंद प्रमुख व आदी कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तर अध्यक्षिय समारोप करतांना जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर पुढे म्हणाले की,केंद्र व राज्य सरकारचे लोकाभिमुख विकासात्मक पाठबळ आपल्यासोबत आहे.त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पक्ष कार्यात स्वतःला झोकून द्यावे.आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर परिषद व आदी निवडणूका आपणास लढवायच्या आणि जिंकायच्या आहेत.आपण त्या दिशेने काम करावं,हे केल्यास यात आपणास नक्कीच यश मिळणारच आहे,असे ही ते म्हणाले.
सदरील आढावा बैठकीस युवा मोर्चाचे प्रशांत पोपशेटवार,तालुका सरचिटणीस चंद्रकांत नागमोडी, भोकर तालुका महिला आघाडी अध्यक्षा विजयाताई घिसेवाड व तालुका आणि शहरातील बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या बैठकीत उपस्थित बुथ प्रमुख,शक्तीकेंद्र प्रमुख यांसह आदींनी कार्य अहवाल सादर केला.तर ही बैठक यशस्वी करण्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणी पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.