Sat. Dec 21st, 2024
Spread the love

नांदेड जिल्ह्यातील ह्या दोन खेळाडू आता राष्ट्रीय रग्बी क्रीडा स्पर्धेत देशपातळीवर खेळणार…

अंबुज प्रहार प्रतिनिधी

नांदेड : नांदेड येथील विद्यार्थीनी कु.आदिती प्रवीणराव बोरकर आणि भोकर येथील विद्यार्थीनी कु.किंजल गोविंद थोरात ह्या दोन खेळाडू मुलींची महाराष्ट्र रग्बी फुटबॉल संघात निवड झाली असून दि.२१ ते २३ डिसेंबर २०२२ रोजी अहमदाबाद, गुजरात राज्य येथे होत असलेल्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत त्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.त्यांच्या या यशा बद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत असून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

नेरळ जिल्हा रायगड येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्य स्तरीय रग्बी फुटबॉल स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघात नांदेड जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालय एस.सी.आर.नांदेड येथील विद्यार्थीनी कु. आदिती प्रवीणराव बोरकर व विमल इंग्लिश स्कूल भोकर येथील विद्यार्थीनी कु.किंजल गोविंद थोरात ह्या दोघींनी कर्णधार व उपकर्णधार म्हणून जबाबदारी पेलत उत्तमरित्या खेळत आपल्या संघास सेमी फायनल पर्यंत नेले होते.अटी तुटीच्या सामन्यात या दोघींनी पहिलाच गोल करुन आपल्या संघास बळकटी देण्याची कौतुकास्पद खेळी खेळली होती.त्यांनी कौतुकास्पद खेळी खेळत उपस्थित प्रेक्षक आणि क्रीडा पंच यांचे मन जिंकले होते.त्यांच्या उत्तम खेळ प्रदर्शनाची दखल घेऊन निवड चाचणी स्पर्धेत त्यांना सहभागी करुन घेतले.अशा प्रकारे निवड झालेल्या महाराष्ट्रातील असंख्य खेळाडूंचे नंदूरबार जिल्हा येथे दि.१६ ते १९ डिसेंबर २०२२ रोजी दरम्यान निवड चाचणी सराव शिबिर संपन्न झाले.यातही त्यांनी आपली उत्तम खेळी दखलपात्र ठरविली.त्यामुळे उपस्थित क्रीडा पंचांनी ह्या दोघींची महाराष्ट्र रग्बी फुटबॉल संघात निवड केली आहे.नांदेड जिल्ह्यातील ह्या दोन खेळाडू आता महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करुन देशभरातून येणाऱ्या विविध राज्य संघाविरुद्ध त्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार आहेत.नांदेड जिल्हा व भोकर तालुक्यासाठी ही बाब अभिमानास्पद आहे.

महाराष्ट्र राज्य संघात ह्या दोघींनी स्थान मिळविले असून दि.२१ ते २३ डिसेंबर २०२२ रोजी दरम्यान होत असलेल्या राष्ट्रीय रग्बी फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी त्या दोघी अहमदाबाद,गुजरात राज्य येथे गेल्या आहेत. त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट रग्बी खेळाडू स्व.सुमित विनोद सुरदसे,वरीष्ठ रग्बी खेळाडू कु.पार्वती चव्हाण, कु.राणी जाधव यांची प्रेरणा मिळाली असून मुख्य क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळाडू प्रशिक्षण घेऊन भोकर तालुका व नांदेड जिल्ह्याचे नाव देशपातळीवरील क्रीडा क्षेत्रात मोठे करत आहेत.त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल नांदेड जिल्हा रग्बी संघटनेचे महासचिव प्रलोभ एम.कुलकर्णी,साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण तथा भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,उपाध्यक्ष आर.के. कदम,सचिव बालाजी नार्लेवाड,संघटक सुधांशू कांबळे,कोषाध्यक्ष गंगाधर पडवळे,सहसचिव कमलाकर बरकमकर,पदाधिकारी विठ्ठल सुरलेकर, बालाजी कदम पाटील,गजानन गाडेकर,अंबादास बोयावार,विशाल जाधव,विमल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य लक्ष्मण जाधव,शाळेचे क्रीडा शिक्षक राजेश खिल्लारे, रग्बी संघाचे पदाधिकारी,खेळाडू,पालक,हितचिंतक यांसह आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !