बाळासाहेबांची शिवसेना भोकर शहर प्रमुख पदी अजय टाक
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भोकर शहर प्रमुख पदी अजय टाक यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्ष वाढीसाठी क्रियाशील व होतकरु शिवसैनिकांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात येत असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशाने नुकतीच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भोकर शहराध्यक्ष पदी अजय टाक यांची मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली.नियुक्ती पत्र ही देण्यात आले.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव सजंयजी मोरे,उपनेते तथा हिंगोली व नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदरावजी जाधव,आमदार बालाजीराव कल्याणकर,दक्षिण नांदेड जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर,नांदेड उपजिल्हा प्रमुख सचिनजी किसवे, भोकर तालुका प्रमुख अमोल धनराज पवार यांसह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यापुर्वी अजय टाक हे भाजपा युवा मोर्चाचे भोकर तालुकाध्यक्ष होते.त्यांनी भाजपास सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.त्यांचे संघटन कौशल्य पाहून ही नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या नियुक्तीचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह अनेकांतून अभिनंदन केल्या जात आहे आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.