‘समता पर्व सप्ताह’ निमित्त जि.प.केंद्रीय शाळेची हळदा येथे प्रभात फेरी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी तसेच दिव्यांग बालकांकडे समान संधी व मानवी अधिकाराबाबत समान दृष्टिकोनातून पाहण्यासाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यासोबत कोणताच भेदभाव होऊ नये,त्याच बरोबर त्यांच्या पालकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होऊ नये,यासाठी केंद्र शासनाच्या वतीने दि.३ डिसेंबर रोजी समता पर्व दिन म्हणून पाळण्याचे परिपत्रक केंद्र शासनाकडून काढण्यात आले असून दि.३ डिसेंबर २०२२ ते ९ डिसेंबर २०२२ दरम्यान “समता सप्ताह” साजरा करण्याचे परिपत्रक सर्व शाळांना दिलेल्या पात्राच्या अनुषंगाने हळदा केंद्रीय शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून गावात जनजागृती करण्यात आली.
या प्रभात फेरीत दिव्यांगाचे शिक्षण- प्रगतीचे लक्षण.मिळून सारे ग्वाही देऊ- दिव्यांगांना सक्षम बनवू.दिव्यांगाचा सन्मान- हाच आमचा अभिमान.तुमचा आमचा एकच नारा- दिव्यांगाना देऊ सहारा.उठ दिव्यांग जागा हो- समाजाचा धागा हो.आदी घोषणा देत विद्यार्थ्यांनी दिव्यांगा बाबत गावातून जनजागृती केली. या प्रभात फेरीत माजी सरपंच तथा पत्रकार बालाजी नार्लेवाड, मुख्याध्यापक एस.बी.इबितवार,सहशिक्षक व्ही.बी.न्यायालमवार, आर.एम.व्यवहारे,एस.आर.मंडलापुरे,एस.एम.सावंत,एम.आर. हंबर्डे,एम.एल.मिटकरी,एस.पि.तिगोटे यांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.