होय..तुम्हा सर्वांमुळेच मी आज जिल्हाप्रमुख पदावर आहे-बबनराव बारसे
भोकर मध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या जंगी स्वागताचे आकर्षण ठरला ३ क्विंटलचा पुष्पहार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : जनहित व जनसेवार्थ अनेक आंदोलने केली,लाठ्या काठ्या खाल्ल्या,वेळप्रसंगी तुरुंगात ही जावे लागले.अनेक खस्ता खाल्ल्या.परंतू हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व शिवसेनेशी गद्दारी कदापिही केली नाही.शिवसेना व सामान्य शिवसैनिक आणि जनता यांच्याशी सदैव नाळ जोडून ठेवलो आहे.म्हणूनच तुम्हा सर्व सामान्य शिवसैनिकांमुळेच मी आज जिल्हाप्रमुख पदावर आहे.असे भावोद्गार नुतन जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांनी भोकर येथील स्वागत सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदी बबनराव बारसे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून पदनियुक्तीनंतर दि.३० नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांचे भोकर नगरीतील पहिल्या आगमना प्रित्यर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका व शहर शाखेच्या शिवसैनिकांच्या वतीने भव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांचे भोकर शहरात आगमन होताच शिवसैनिकांनी भव्य आतिशबाजी करत व ढोल ताशाच्या गजरात मिरवणूकीने त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नेण्यात आले.तसेच त्या ठिकाणी क्रेनद्वारे ३ क्विंटल वजनाच्या भल्या मोठ्या गुलाब पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले.भोकर शहरातील स्वागताच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे स्वागत करण्यात आल्याने हा पुष्पहार या स्वागत सोहळ्याच्या औचित्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता व हे एक आकर्षण ठरले.
यानंतर शासकीय विश्रामगृह भोकर येथे बबनराव बारसे हे सत्कारास उत्तर देतांना व उपस्थितांशी संवाद साधतांना पुढे म्हणाले की,काही खोकेबाजांनी शिवसेना संपविण्याचे प्रयत्न केले.परंतू तळागाळातील लोकांशी व सच्चा शिवसैनिकांशी नाळ जोडलेली असल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष तेवढ्याच जोमाने उभा राहिला आहे.आता राज्यात शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र येणार असल्याने पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे हात अधिक बळकट होणार आहेत.तसेच खोटे सेनेशी सामना करण्यासाठी आता प्रत्येक शिवसैनिक सज्ज झाला असून पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना पुनश्च एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहिलं पाहिजे.जिल्ह्यात जास्तीत जास्त शिवसेना पक्षाला बळकटी देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहूयात व मला जिल्हाप्रमुख म्हणून सेवेची संधी दिली असल्याने या संधीत कसला कसूर माझ्याकडून होणार नाही व प्रत्येक शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी कटीबद्ध राहिलं.अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख,विधानसभा प्रमुख विश्वम्बर पवार,विधानसभा संघटक गोविंदराव शिंदे,अर्धापुर तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर,मुदखेड तालुकाप्रमुख पिंटू पाटील वासरीकर,उमरी तालुकाप्रमुख बालाजीराव सावंत,भोकरचे तालुकाप्रमुख माधव पाटील वडगावकर,शहरप्रमुख पांडुरंग वर्षेवार,अर्धापुरचे माजी उपसभापती अशोक कपाटे,महिला आघाडी तालुकाप्रमुख आनंदाताई चुनगुरवाड,मुदखेड शहरप्रमुख अविनाश झमकडे, सचिन चंदरे,माजी तालुकाप्रमुख प्रदीप दौलतदार,ॲड. परमेश्वर पांचाळ,नारायण पाटील पोमनाळकर,ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक,गंगाधर महादावाड, साहेबराव भोम्बे,बालाजी येलपे,संतोष आलेवाड,वामन महाराज पर्वत,मनोहर साखरे,संभाजी देशमुख,सुनील चव्हाण,सुनील पाटील जाधव,रमेश पोलकमवार,राजू पोगरे,संभाजी पोगरे,मारोती पवार,रामा भालेराव, युवासेना उपजिल्हाप्रमुख माधव करेवाड,युवासेना तालुकाधिकारी आनंद जाधव,शहाराधिकारी कृष्णा कोंडलवार,प्रकाश वारले,काशिनाथ टिकेकर,योगेश डुरे,रामेश्वर वाघाळे,लक्ष्मण इरलोड,गुजराल सूर्यवंशी, नांदेड सोशल मीडिया मारोती मोगरकर,काझी सल्लाउद्दीन,पिंटू सुम्पे नांदेड,अशोक डांगे,संग्राम करवंदे यांसह बहुसंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती.तर सदरील स्वागत सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हाप्रमुख सतिश देशमुख,तालुकाप्रमुख माधव पाटील वडगावकर,शहर प्रमुख पांडूरंग वर्षेवार व तालुका आणि शहरातील अनेक शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.