बाचोटीचे जेष्ठ नागरिक दगडू वाघमारे अनंतात विलीन
सामाजिक कार्यकर्ते संग्राम वाघमारे यांना पितृशोक
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मुळचे कंधार तालुक्यातील व हल्ली मु.मौ.बाचोटी(वाकद) या.भोकर येथे स्थायिक झालेले जेष्ठ नागरिक दगडू लोकडोबा वाघमारे यांचे राहत्या घरी दि.२९ नोव्हेंबर २०२२ रोजी अल्पशा: आजाराने दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुलं,मुलगी,सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.भोकर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते तथा विद्युत व जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते म्हणून सर्वपरिचित असलेले संग्राम वाघमारे यांचे ते वडील होत.स्व.दगडू वाघमारे यांच्या पार्थिवावर दि.३० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २:३० वाजता मौ.बाचोटी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी जि.प.चे माजी गटनेते तथा सभापती प्रकाश देशमुख भोसीकर,वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा माजी नगरसेवक केशव मुद्देवाड,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे,सामाजिक कार्यकर्ते केरबाजी देवकांबळे,शासकीय कंत्राटदार सखाराम वाघमारे,पत्रकार कमलाकर बरकमकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर,प्रतिष्ठीत नागरिक,संबंध जिल्ह्यातील नातेवाईक व आप्तेष्टांनी बहुसंख्येने उपस्थिती होती.
संपादक उत्तम बाबळे व परिवार वाघमारे परिवाराच्या दु:खात सहभागी असून स्व.दगडू वाघमारे काकांना विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!