Mon. Dec 23rd, 2024

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे डी.लिट ने सन्मानित झाल्याने भोकरमध्ये आनंदोत्सव

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : मराठवाड्यातील पहिले स्वयं अर्थसाहाय्यित खासगी विद्यापीठ असलेल्या महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठ, औरंगाबादच्या पहिल्या दीक्षांत समारंभात विद्यापीठ श्रेष्ठीने विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना दि.२७ नोव्हेंबर रोजी मरणोत्तर डी.लिट (मानद) पदवी प्रदान केली.साठे कुटूंबियांच्या वतीने त्यांच्या सुनबाई सावित्रीबाई मधुकर साठे यांनी ही पदवी स्विकारली असून आता साहित्यरत्न हे डॉ.अण्णा भाऊ साठे झाल्याने दि.२९ नोव्हेंबर रोजी भोकरमध्ये भव्य आतिशबाजी करुन व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.तसेच एमजीएम विद्यापीठ व प्रशासनाचे अभिनंदन आणि ऋण व्यक्त ही करण्यात आले आहेत.

विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अमूल्य व अतुल्य आहे.हे पाहता ते ज्ञानपीठ व भारतरत्न पुरस्काराचे हक्कदार आहेत.म्हणूनच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना डी.लिट,ज्ञानपीठ,भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी अनेकांतून होत होती.याच अनुषंगाने सोलापूर व अन्य एका विद्यापीठाने त्यांना डी.लिट ने सन्मानित करण्याची घोषणा केली होती.परंतू सन्मानित केले नाही.तर मराठवाड्यातील पहिले स्वयं अर्थसाहाय्यित खासगी विद्यापीठ असलेल्या महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठ, औरंगाबादने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना डी.लिट(मानद) पदवी देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला व दि.२७ नोव्हेंबर २०२२ रोजी औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या पहिल्या दीक्षांत समारंभात विद्यापीठ श्रेष्ठीने विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर डी.लिट (मानद) पदवी प्रदान केली.

त्यामुळे साहित्यरत्न हे डॉ.अण्णा भाऊ साठे झाले.ही बाब डॉ.अण्णा भाऊ साठे प्रेमी,विचार अनुयायी व समाज बांधवांसाठी अभिमानास्पद असल्याने दि.२९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता भोकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.अण्णा भाऊ साठे प्रेमी,विचार अनुयायी व समाज बांधवांनी भव्य आतिशबाजी करुन व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.तसेच डॉ.अण्णा भाऊ साठे व आदी महापुरुषांच्या नावाचा जयघोष करत एमजीएम विद्यापीठाचे सर्वांनी ऋण व्यक्त केले.

या आनंदोत्सवात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाघमारे, जेष्ठ पत्रकार राजेश वाघमारे, बालाजी नार्लेवाड,सामाजिक कार्यकर्ते राजन्ना माहूरकर,पांडूरंग सुर्यवंशी,शिवकुमार गाडेकर, सखाराम वाघमारे,केरबाजी देवकांबळे,देवराव मनपुर्वे,साहेबराव भालेकर,पत्रकार अनिल डोईफोडे,अरुण डोईफोडे,बाबूराव नामेवाड,पेंटर पुंडलिक गाडेकर,श्याम वाघमारे,संजय चिंचोलकर,बाबूराव शिंगणीकर,साहेबराव शिंगणीकर,विठ्ठल शेळके,मानवहितचे संजय वाघमारे बोथीकर,पार्वतीबाई बरकंबे,गजानन गाडेकर,दत्ता भंडारे,शंकर दिवटेकर,अंबादास बोयावार,मुकीन गोर्लेकर,संतोष कांबळे,माधव गाडेकर,रामेश्वर शिंगणीकर यांसह बहुसंख्य डॉ.अण्णा भाऊ साठे प्रेमी,विचार अनुयायी व समाज बांधव सहभागी झाले होते.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !