Mon. Dec 23rd, 2024

शेर ए हिंद टिपू सुलतान यांची जयंती कायदा चे पालन करुन साजरी करावी-डॉ.खंडेराय धरणे

Spread the love

जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ते सर्व कायदा चे पालन करुनच साजरे करणार-बाबा खान पठाण

जयंती निमित्ताने भोकर येथे आयोजित महा रक्तदान शिबिरात बहुसंख्य दात्यांनी केले रक्तदान

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांची सार्वजनिक जयंती भोकर शहरात दि.२५ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार असून या औचित्याने दि.१८ नोव्हेंबर रोजी भोकर पोलीस ठाण्यात संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत भोकर पोलीस विभागाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांनी कायदा चे पालन करुन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करावी, असे आवाहन केले.तर विविध कार्यक्रम व उपक्रमांनी हा जयंती सोहळा कायदा चे पालन करुनच साजरा करणार अशी ग्वाही सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बाबा खान पठाण यांनी यावेळी दिली आहे.

शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांचा सार्वजनिक जयंती सोहळा भोकर शहरात साजरा होणार असल्याच्या औचित्याने भोकर पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा, शांतता व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात भोकर पोलीस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांच्या अध्यक्षतेखाली व भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना(भा.पो.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक जयंती मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली.

बैठकीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून कायदा,शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी काही सुचना मांडल्या व डिजेसह आदी बाबद मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अद्यादेशाची माहिती दिली.तर मिरवणूक,डिजे,मिरवणूकीचा मार्ग व समारोपाचे ठिकाण,कार्यक्रम आणि विविध उपक्रमांविषयी उपस्थितांत चर्चा झाली.चर्चेअंती उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना (भा.पो.से.)यांनी जयंती सोहळ्या दरम्यान जयंती मंडळाने पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे,असे आवाहन केले.तर अध्यक्षिय समारोप करतांना अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे हे म्हणाले की,महापुरुषांच्या जयंती सोहळ्याचे पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे.मिरवणूक व कार्यक्रमांदरम्यान एखाद्याकडून गालबोट लागेल असा कुठलाही प्रकार होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.पोलीस व प्रशासनाचे सहकार्य असेलच.कायदा चे पालन करुन हा जयंती सोहळा उत्साहात साजरा करावा.परंतू कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही.असे ते म्हणाले.

जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ते सर्व कायदा चे पालन करुन साजरे करणार-बाबा खान पठाण

यावेळी सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बाबा खान पठाण यांनी जयंती सोहळ्याच्या औचित्याने शहरात साजरे होणाऱ्या कार्यक्रम व उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की,दि.१९ नोव्हेंबर २०२२ रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी शासकीय ग्रामीण रुग्णालय,मुक बधीर शाळा व उर्दू शाळेत फळे वाटप करण्यात येणार आहेत.तसेच दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४:०० वाजता सईद येथून तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.या मुख्य मिरवणूकीत मुधोळ गल्ली,हाश्मी नगर येथून निघालेल्या मिरवणूका सहभागी होतील व टिपू सुलतान चौक महात्मा फुले नगर येथे या मिरवणूकीची सांगता करण्यात येणार आहे.यानंतर तेथेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून काही निमंत्रित विचारवंत आणि मान्यवर शेर ए हिंद टिपू सुलतान यांच्या जीवन कार्यावर विचार मांडणार आहेत.हे सर्व कार्यक्रम व उपक्रम कायदा चे पालन करुन साजरे करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली‌. तसेच या सर्व सोहळ्यात बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

या बैठकीस जयंती मंडळाचे उपाध्यक्ष संदिप पाटील गौड, जुनेद पटेल,नाझिम बाबा,हमिद खान पठाण, शेख सऊद गोंदवाले,मन्सूर खान पठाण,मिलींद गायकवाड,क्रीम करखेलीकर यांसह जयंती मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शांतता समिती सदस्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. सदरील बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वांचे पो.उप.नि. दिगांबर पाटील यांनी आभार मानले व बैठकीची सांगता करण्यात आली.

जयंती निमित्ताने भोकर येथे आयोजित महा रक्तदान शिबिरात बहुसंख्य दात्यांनी केले रक्तदान

शांतता समितीच्या बैठकीत दिलेल्या माहितीनुसार दि.१९ नोव्हेंबर २०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी भोकर येथील यल्गार बॉईज व अक्सा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात होते.या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १०० घ्या वर दात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदविला.मौलाना मुबिन खान इनामदार,सय्यद जुनेद, डॉ.फेरोज खान इनामदार,संदीप पाटील गौड,अक्सा ग्रुपचे मोईज अहेमद बागवान,अब्दुल सलाम,मोहमद जुबेर,सना इनामदार,पत्रकार शमीम इनामदार, जयभीम पाटील,लतिफ शेख यांसह आदी पत्रकार बांधवांच्या हस्ते सहभागी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व रक्तदान कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.तर क्रीसेंट ब्लड सेंटर नांदेड यांनी दात्यांचे रक्त संकलन केले व हे शिबीर यशस्वी करण्यासाठी एम.डी.जुबेर, अली असगर,शेख बशिर,एम.डी.जुनेद,शेख माजीद, सोफियान शेख,सोएब कुरेशी,रिजवान खान,सद्दाम इनामदार,शारूख शेख,शेख जुबेर,मोहम्मद सबील, मोहम्मद अकिब यांसह आदींनी परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !