उद्या राष्ट्रवादीची ‘शरद युवा संवाद यात्रा’ भोकर मध्ये येणार..
शरद युवा संवाद यात्रा सभेस बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा उपाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,युवा तालुकाध्यक्ष व भोकर शहराध्यक्षांसह आदींनी केले आवाहन
अंबुजा प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित ‘शरद युवा सवांद यात्रा’ उद्या दि.१८ नोव्हेंबर रोजी भोकर मध्ये दाखल होणार असून माऊली मंगल कार्यालय भोकर येथे आयोजित शरद युवा संवाद यात्रा सभेस बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष जवाजोद्दीन बरबडेकर, तालुकाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार,युवा तालुकाध्यक्ष गणेश ऊर्फ पप्पू बोलेवार व भोकर शहराध्यक्ष डॉ.फेरोज इनामदार यांसह आदींनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे देशाचे सर्वसमावेशक नेतृत्त्व असून सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी देणारे तसेच कामगार,कष्टकरी,शेतकरी व सर्व सामान्यांसाठी झटणारे नेते आहेत.त्याचे विचार तळागाळातील जनते पर्यत पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते सातत्याने करत आहेत.त्याच अनुषंगाने खा.शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित ‘शरद युवा सवांद यात्रा’ संबंध राज्यात काढण्यात येत असून दि.१६ नोव्हेंबर २०२२ रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून ही युवा संवाद यात्रा निघाली आहे.तर दि.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी धर्माबाद,उमरी तालुक्यातील युवक व जनतेशी संवाद साधून दुपारी ४:०० वाजताच्या दरम्यान या यात्रेचे भोकर तालुक्यात आगमन होणार आहे.
भोकर शहरातील आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे येणाऱ्या दुचाकी,चारचाकी वाहनांच्या सहभागातील भव्य शरद युवा संवाद यात्रेची सांगता माऊली मंगल कार्यालय,किनवट रोड भोकर येथे होणार असून तिचे युवा संवाद सभेत रुपांतर होणार आहे.या संवाद सभेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.तरी या ‘शरद युवा संवाद यात्रा सभेस’ बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष जवाजोद्दीन बरबडेकर,तालुकाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार,युवा तालुकाध्यक्ष गणेश ऊर्फ पप्पू बोलेवार व भोकर शहराध्यक्ष डॉ.फेरोज इनामदार,युवा शहराध्यक्ष अफरोज पठाण यांसह आदींनी केले आहे.