Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

तालुक्यातील आदिवासी समाजाचे स्वप्न साकार होण्याची प्रतिक्षा

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : तालुक्यात विविध ठिकाणी क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती औचित्याने तालुक्यातील विविध ठिकाणी भगवान बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मौ.आमदरीवाडी येथे ज्येष्ठ नागरिक सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा चौक येथे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.तर भोकर शहरातील एस.टी महामंडळ आगारात कंट्रोलर हनुमंत वागतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चालक,वाहक व आगारातील आदी कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तर आश्रम शाळा भोसी येथे मुख्याध्यापक संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि संत गाडगेबाबा आश्रम शाळा,सिताखांडी येथे मुख्याध्यापक,शिक्षकवृंद व  विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.

क्रांतिवीर भगवान बिर्ला मुंडा यांच्या जयंती निमित्ताने बोरवाडी,वाकद,ताटकळवाडी,बाबनवाडी,आमदरी नवीन,झिंगारवाडी,नारवट,आमदरी,गारगोटवाडी येथील शाळा,ग्रामपंचायत कार्यालय व भोकर येथील महाविद्यालयात या महानायकाला दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोजी अभिवादन करण्यात आले आणि मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आले.

तालुक्यातील आदिवासी समाजाचे स्वप्न साकार होण्याची प्रतिक्षा

भोकर तालुक्यात बहुसंख्येने आदिवासी समाज असल्याने भोकर शहरात त्यांच्या मुला-मुलींसाठी शासनाच्या जागेत वसतीगृहाची भव्य इमारत बांधण्यात यावी,भोकर शहरात बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा,बोरवाडी गावात सांस्कृतिक सभागृह व्हावे आणि डोरली येथे एक मोठे तलाव व्हावे यासाठी सर्व समाज प्रयत्नशील आहे.परंतू अद्याप तरी हे पुर्णत्वास आले नसल्याने ते स्वप्नवत असल्याची खंत व्यक्त होत असून हे स्वप्न लवकरात लवकर साकार व्हावे अशी अपेक्षा व प्रतिक्षा समाज बांधवांतून होत आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !