Fri. Apr 18th, 2025

१०० आमदार निवडूण आणण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यक्षमता सिद्ध करावी-बबनराव थोरात

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंदेरी विधानसभा मतदार संघातून ऋतुजा लटके यांच्या विजयश्रीने नव्या जोमाने मुहूर्तमेढ रोवली असून आता पुढील निवडणूकीत १०० आमदार निवडूण आणण्यासाठी शिवसैनिकांनी आपली कार्यक्षमता सिद्ध करायची आहे.त्यासाठी एकमेकांची मने जोडण्याचे काम करायचे असून आढावा बैठक घेण्यामाघील मुख्य उद्देश हाच आहे.असे प्रतिपादन संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी भोकर येथील माऊली मंगल कार्यालयात दि.६ नोव्हेबर रोजी भोकर विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांच्या आढावा बैठकीत व्यक्त केले.

भोकर विधानसभा मतदार संघातील भोकर,मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका तालुका प्रमुख,उप तालुकाप्रमुख,संपर्क प्रमुख,सर्कल प्रमुख,शहर प्रमुख यांसह आदी पदाधिकारी व शिवसैनिकांची एक महत्वपुर्ण संयुक्त आढावा बैठक भोकर येथील माऊली मंगल कार्यालयात दि.६ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न झाली.या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची उपस्थिती होती.तर जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे,जिल्हा सह संपर्क प्रमुख प्रकाश मारावारा,लोकसभा संघटक मनोज भंडारी,डॉ.बी. डी.चव्हाण,युवासेना राज्य महासचिव माधवराव पावडे, माजी युवा सेनाप्रमुख महेश खेडकर,माजी जि.प.सदस्य बबनराव बारसे,संतोष कल्याणवर,मुदखेड तालुका प्रमुख पिन्टु पाटील वासरीकर,मा.नगर सेवक बाळासाहेब देशमुख, विधान सभा संघटक विश्वांभर पाटील पवार,अविनाश झमकडे,अंकुश मामीडवार,भोकर तालुका प्रमुख माधव वडगांवकर,भोकर शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार यांची आढावा मंचावर उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पुजन करण्यात येऊन तालुका निहाय पदाधिकाऱ्यांकडून पक्ष बांधनी व कार्याचा आढावा घेण्यात आला.यावेळी बबन बारसे,दत्ता पाटील कोकाटे, डॉ.बी.डी.चव्हाण,विश्वांभर पवार यांनी आढावा बैठकीस अनुसरुन मार्गदर्शन केले.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना संपर्क प्रमुख बबनराव थोरात पुढे म्हणाले की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सैन्य किती होते हे पाहण्यापेक्षा त्या सैनिकांत लढण्याची उर्मी किती होती हे पाहणे उचित आहे.ती उर्मी व प्रेरणा आत्मसात केली पाहिजे.आणि हिच प्रेरणा घेऊन पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे निष्ठावान शिवसैनिकांत विचार पेरण्याचे काम करत आहेत. हे विचार पुढे नेण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ता शिवसेनेस आवश्यक असून निष्ठावान शिवसैनिक हाच पक्षाचा महत्वाचा मानबिंदू आहे.मातोश्रीची हात बळकट करुन गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे १०० आमदार निवडून आणण्याची रणनिती आखत आहेत व ती रणनिती यशस्वी करण्याची जबाबदारी निष्ठावंत शिवसैनिकांची असून प्रेत्यक पदाधिकारी यासह सैनिकांनी आपली कार्यक्षमता सिद्ध करावी,असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.या बैठकीस संतोष आलेवाड,आनंद जाधव,कृष्णा कोंडलवार,अक्षय शिंदे,ज्ञानेश्वर पाटील,मनोहर साखरे,गंगाधर महादावाड,नंदु पाटील,श्याम वाघमारे,परमेश्वर राव,गजानन तंवर यांसह तिन्ही तालुक्यातील व शहरातील असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.बैठकीचे प्रास्ताविक पिन्टू पाटील वासरीकर यांनी केले तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार बालाजी येलपे यांनी मानले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !