उद्या भोकरमध्ये अवर सचिव राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते गुणवंताचा सन्मान
भगवती सेवा प्रतिष्ठाण,भोकर संचलित भोकर विचार विकास मंचने केले आहे गुणवंताच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कठीण परिस्थितीवर मात करुन यश संपादित करणा-या यशवंतांच्या पाठीवर सन्मानाची थाप देऊन पुढील यशासाठी प्रोत्साहित करणे हे एक सेवाभांविंचे कर्तव्यच असते.याच उदार हेतूने भगवती सेवा प्रतिष्ठाण,भोकर संचलित भोकर विचार विकास मंचच्या वतीने उद्या दि.३० ऑक्टोबर रोजी भोकर येथे विविध क्षेत्रातील गुणवंतांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री कार्यालय,सचिवालय मुंबई चे अवर सचिव कर्तव्यदक्ष अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते गुवंतांचा सन्मान करण्यात येणार आहे.
भगवती सेवा प्रतिष्ठाण,भोकर संचलित भोकर विचार विकास मंचच्या वतीने रविवार,दि.३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता बालाजी मंदिर,नवा मोंढा, भोकर येथे विविध क्षेत्रातील गुणवंतांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.अथक परिश्रमाने मिळविलेल्या अलौकिक यशाची पावती देणे म्हणजेच त्यांचा यथोचित सत्कार करणे होय,कठिण परिस्थितीवर मात करत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी,पालक,कर्मचारी, शेतकरी,पुरस्कार प्राप्त गावांचा व सेवाभावी संस्थाचा सन्मान करणे ही सेवाभावींची सामाजिक जबाबदारी व समाजाप्रती बांधिलकी आहे.याच उदात्त आणि विधायक दृष्टीकोनातून सरदील गुणवंताच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन आहे.सदरील सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री कार्यालय,सचिवालय मुंबई येथील अवर सचिव राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते गुणवंत व यशवंतांचा सन्मान होणार आहे.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भोकर विचार विकास मंचचे अध्यक्ष डॉ.यु.एल.जाधव हे राहणार असून सुप्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी व शंकर वाडेवाले यांची प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
गुणवंत,यशवंतांच्या सन्मान सोहळ्यात सहभागी होऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व मान्यवर साहित्यिकांच्या अमृतबोलाचा श्रवणानंद घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे विनंतीपर आवाहन कार्याध्यक्ष प्रा.डॉ.व्यंकट माने,उपाध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड,सचिव डॉ.विठ्ठल माने आणि भोकर विचार विकास मंचाच्या सर्व सन्माननिय पदाधिकाऱ्यांनी केले आहे.