शिवसेना…ठाकरे भोकर विधानसभा जिल्हा उपप्रमुखपदी सतिश देशमुख
तर भोकर तालुका प्रमुखपदी माधव पाटील वडगावकर आणि भोकर शहराध्यक्षपदी पांडूरंग वर्षेवार यांची नियुक्ती
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने नांदेड,पुणे व बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा जिल्हा उपप्रमुखपदी सतिश देशमुख यांच्या तर भोकर तालुका प्रमुख पदी माधव जाधव पाटील वडगावकर आणि भोकर शहराध्यक्षपदी पांडूरंग वर्षेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्वांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून स्वागत होत असून पक्ष वाढ व भावी सेवाकार्यासाठी अनेकांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून नुकतेच प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे नांदेड,पुणे व बुलढाणा जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून नांदेड जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत. नांदेड महानगर प्रमुख-पप्पू जाधव (नांदेड महानगर),उपजिल्हाप्रमुख-गणेश गिरी (नायगाव विधानसभा),दिगंबर वाळकीकर (हदगाव विधानसभा),सतिश देशमुख(भोकर विधानसभा),विधानसभा क्षेत्रप्रमुख-ज्योतिवा खराटे (किनवट विधानसभा),तालुकाप्रमुख- माधव पाटील वडगावकर (भोकर तालुका),लक्ष्मण वासरीकर (मुदखेड तालुका),संतोष कल्याणकर (अर्धापूर तालुका),रामचंद्र रेड्डी (धर्माबाद तालुका),सुभाष जाधव (हदगाव तालुका),तालुका संघटक-कैलास पाटिल हातणीकर (उमरी तालुका),बाबुराव वाघ (नदिड उत्तर),माणिक लोमटे (मुदखेड तालुका),मारोती कागेरू (धर्माबाद तालुका),व्यंकट गुजरवाड (बिलोली तालुका),तर शहरप्रमुखपदी-अंकुश मामीडवार (मुदखेड शहर दक्षिण), अविनाश झमकडे( मुदखेड शहर उत्तर), बालाजी बनसोडे (धर्माबाद शहर),साई मुरकुटवार (उमरी शहर), पांडुरंग वर्षेवार (भोकर शहर),शहर संघटकपदी- सचिन चन्द्रे (मुदखेड शहर), विराज देशमुख (अर्दापूर शहर),राजू श्रीरामे(धर्माबाद शहर).
शिवसेनेत उभी फुट पडली व मोठ्या प्रमाणात पक्षांतर आणि त्यानंतर सत्तांतर झाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात तथा सद्याच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अनेक आमदार,खासदार व शिवसैनिक गेले.परंतू माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटात तथा सद्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रेमी बहुसंख्य शिवसैनिक राहिले.त्यातीलच भोकर तालुक्यातील सच्चा शिवसैनिकांची नावे म्हणजेच माजी भोकर तालुका प्रमुख तथा डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतिश देशमुख,माजी भोकर शहर प्रमुख माधव पाटील वडगावकर व माजी महानगर प्रमुख पांडूरंग वर्षेवार हे होत.उपरोक्त शिवसैनिकांनी पक्ष सोडला नाही व सत्ताधाऱ्यांच्या माघे न जाता पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समर्थपणे साथ दिली.पक्ष वाढीसाठी अनेक शिवसैनिकाची सदस्य नोंदणी यांनी करुन घेतली.त्याच्या माघिल कार्यकाळातील व सद्याच्या पक्ष कार्याची दखल संपर्क प्रमुख बबनराव थोरात,जिल्हा प्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली आणि पदाधिकारी पदी यांची नियुक्ती व्हावी म्हणून पक्षप्रमुखांकडे उपरोक्तांची शिफारस केली. यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती कार्यालय,मुंबई येथून यांच्या नवनियुक्तीचे प्रसिद्धी पत्रक काढ्यात आले व उपरोक्त पदी वरील तिघांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले.सतिश देशमुख,माधव पाटील वडगावकर व पांडूरंग वर्षेवार या सारख्या सच्चा शिवसैनिकांना सदरील नियुक्तीने पक्षप्रमुखांनी न्याय दिला असून या नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.तसेत भावी पक्ष सेवाकार्यासाठी अनेकांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
उपरोक्त नवनियुक्त तिन्ही पदाधिकाऱ्यांचे अगदी मनापासून खुप खुप अभिनंदन व भावी सेवाकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा! उत्तम बाबळे,संपादक
दीपावली व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त खालील मान्यवर व आम्हा कडून अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा!
🌹🌺🌹
उत्तम बाबळे,संपादक