Fri. Apr 18th, 2025

६ डिसेंबर पुर्वी ‘ते’ प्रलंबित प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करु-सुनिल कांबळे

Spread the love

भोकर शहरतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेतील अतिक्रमण काढणे व बौद्ध स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भोकर तालुका वंचित बहुनज आघाडीने दिला आंदोलनाचा इशारा

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याठिकाणी झालेले अतिक्रमण काढण्यात यावे व शुभोभिकरण करण्यात यावे आणि बौद्ध स्मशानभूमिचा प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्यात येऊन शुशोभीकरण करण्यात यावे.या मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भोकर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले असून दि.६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनापुर्वी उपरोक्त प्रलंबित प्रश्न संबंधित यंत्रणेने सोडवावेत अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष सुनिल कांबळे यांनी दिला आहे.

गेल्या अनेक दशकापासून भोकर शहरातील काही प्रलंबित प्रमुख मागण्या संदर्भात लक्ष वेधण्यासाठी भोकर तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनिल कांबळे यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना एक निवेदन दिले आहे.त्या निवेदनात म्हटले आहे की,महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याठिकाणी झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून तालुक्यातील बौद्ध बांधव,विचार अनुयायी,अनेक सामाजिक संघटना व विविध समाजाच्यावतीने अनेकवेळा शासन प्रशासनास निवेदन देण्यात आली आहेत.तसेच अनेक आंदोलने,उपोषणे केली आहेत.परंतू अद्यापही तेथील अतिक्रमण काढण्यात आलेले नाही.तर दोन अतिक्रमण धारकांनी ते अतिक्रमण काढण्यास स्पष्ट नकार देत न्यायालयात धाव घेतली आहे.असे असले तरी स्थानिक प्रशासन व नगर परिषदेने त्या दोघांना इतरत्र पर्यायी जागा उपलब्ध करुन दिली तर हा प्रश्न सुटू शकतो.

याचबरोबर भोकर बस स्थानक परिसरा जवळील नियोजित बौद्ध स्मशानभूमीची जागा आहे.या जागेचे शुशोभीकरण करण्यासाठी विद्यमान आमदार अशोक चव्हाण व भोकर नगर परिषदेने निधी मंजूर केला होता.शुशोभीकरण कामाचे उद्घाटन करण्यात येऊन त्या कामाच्या फलकाचे अनावरण ही करण्यात आले.परंतू काही तांत्रिक अडचणी दाखवून प्रशासनाने तो निधी तेथे खर्च केला नसल्याने गेल्या दोन वर्षापासून शुशोभीकरणाचा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे. म्हणून भोकर शहराच्या विकासात भर टाकणारे उपरोक्त प्रश्न प्रलंबित राहिल्याने ते तात्काळ सोडविण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहे.तसेच दि.६ डिसेंबर २०२२ अर्थातच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापुर्वी उपरोक्त मागण्या पुर्ण कराव्यात अन्यथा भोकर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील कांबळे,भोकर शहराध्यक्ष शेख अजिम यांसह आदी पदाधिकाऱ्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !