Mon. Dec 23rd, 2024

खा.प्रतापराव चिखलीकर यांनी समाजसेवक स्व. वाघमारे यांच्या कुटूबियांचे केले सांत्वन

Spread the love

स्व.गुंडप्पा देशमाने आणि स्व.श्रीमती गंगाबाई किन्हाळकर यांच्या कुटूंबीयांचे ही केले सांत्वन

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दि.७ ऑक्टोबर रोजी भोकर दौरा केला व या दौ-या दरम्यान भोकर येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ समाजसेवक स्व.लालबाजी वाघमारे,स्व.गुंडप्पा देशमाने आणि स्व.श्रीमती गंगाबाई किन्हाळकर यांचे निधन झाल्याने या तिघांच्या ही घरी त्यांनी भेट देऊन कुटूंबियांचे सांत्वन केले आहे.

भोकर येथील बांधकाम कंत्राटदार तथा भाजपाचे कार्यकर्ते नामदेव वाघमारे यांचे वडील आंबेडकरी तथा दलित चळवळीतील जेष्ठ समाजसेवक लालबाजी कृष्णाजी वाघमारे(१००) यांचे दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी दु:खद निधन झाले.तर अमरनाथ बेकरीचे मालक विजय देशमाने यांचे वडील व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के यांचे सासरे स्व. गुंडप्पा बाबन अप्पा देशमाने(७६) यांचे दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी दु:खद निधन झाले.तसेच माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर याच्या काकू(चुलती) व भाजपा युवा मोर्चा भोकर तालुकाध्यक्ष श्रीकांत किन्हाळकर यांच्या आजी स्व.श्रीमती गंगाबाई रामराव पाटील किन्हाळकर यांचे दि.२७ सप्टेंबर २०२२ रोजी दु:खद निधन झाले. या तिन्ही जेष्ठ नारिकांच्या अंत्यविधीस खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे उपस्थित राहू शकले नव्हते.त्या अनुशंगाने त्यांनी दि ७ ऑक्टोबर २०२२ रोजी भोकर दौरा केला व स्व.वाघमारे,स्व. देशमाने आणि स्व.श्रीमती किन्हाळकर यांच्या घरी भेट देऊन त्यांनी या तिन्ही कुटूंबियांचे सांत्वन केले.

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सायंकाळी महात्मा फुले नगर भोकर येथे स्व.लालबाजी वाघमारे यांच्या घरी भेट दिली व स्व.वाघमारे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच स्व.वाघमारे यांचा मुलगा नामदेव वाघमारे,सुन सौ. निलाबाई नामदेव वाघमारे,नातू किर्तीभुषण वाघमारे,बालाजी बाघमारे,पुतण्या सखाराम वाघमारे व नातेवाईकांशी आस्थेवाईकपणे चर्चा करुन त्यांचे सांत्वन केले आणि धिर दिला. यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सोबत भाजपा युवा मोर्चाचे नांदेड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.किशोर देशमुख,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के,तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर,शहराध्यक्ष विशाल माने,जेष्ठ कार्यकर्ते बाळा साकळकर,माजी जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी,साईनंद -याकावार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार एल.ए.हिरे,संपादक उत्तम बाबळे,पत्रकार सुभाष तेले,जयभीम पाटील,डॉ.राम नाईक, भाजपा महिला आघाडीच्या ता.अध्यक्षा विजयाताई घुमनवाड घिसेवाड,सुनिता राचूटकर,संतोष मारकवार,हरीभाऊ चटलावार, आरपीआय चे मनोज शिंदे,माजी संचालक राजू अंगरवार,सुनील शाह,चंद्रकांत नागमोड,वेणू प्रकाश कोंडलवार,शेख अर्शद अहेमद,हरिदत्त हाके,सय्यद जफर,व्यंकटेश आसरवाड यांसह आदींची उपस्थिती होती.

या सांत्वनपर भेटीतील स्व.लालबाजी वाघमारे यांच्या घरील काही क्षणचित्रे…


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !