ईद ए मिलाद..निमित्त भोकरमध्ये ९ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम
‘ईद ए मिलाद उन नबी’ उत्सव साजरा करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी हमिद खान पठाण तर उपाध्यक्षपदी मन्सूर खान पठाण यांची निवड
यात बहुसंख्येने सहभागी होण्याचे ईद ए मिलाद समितीने केले आवाहन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक नियमांमुळे माघील दोन वर्ष देशातील सर्व सण,उत्सवांवर प्रतिबंध घालण्यात आले होते.परंतू यावर्षी सदरील प्रतिबंध हटविण्यात आल्यामुळे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहेत.याच अनुशंगाने ईद ए मिलाद उन नबी (स.अ) तथा इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांच्या जयंती निमित्त दि.९ ऑक्टोबर रोजी भोकर शहरात भव्य मिरवणूकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात बहुसंख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन ईद ए मिलाद समिती भोकरच्या वतीने करण्यात आले आहे.
इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांचा जन्मदिवस ‘ईद ए मिलाद उन नबी’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या पवित्र दिवशी विद्युत रोषणाईने मशिदी सजविल्या जातात.इस्लामी व्यक्तींकडून मशिदींमध्ये पवित्र कुरान व वचनांचे पठण केले जाते,प्रार्थना केली जाते.याच बरोबर गोर गरिबांना विविध प्रकारे मदत केली जाते.तसेच जयघोष करत भव्य मिरवणूक काढली जाते.इस्लाम धर्मात ईद मिलाद उन-नबी या उत्सवाचं अनन्य साधारण महत्त्व आहे आणि हा दिवस इस्लामिक दिनदर्शिके प्रमाणे १२ रबी अल-अव्वल व इंग्रजी दिनदर्शिके प्रमाणे यावर्षी दि.९ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरा करण्यात येत आहे.या औचित्याने दि.९ ऑक्टोबर २०२२ रोजी भोकरमध्ये ‘ईद ए मिलाद उन नबी’ उत्सव विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.शुक्रवार,दि.७ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ७:०० वाजता नुरी चौक,सईद नगर भोकर येथे ‘जलसा’ चे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी काही निमंत्रित इस्लामी धर्मगुरुंचे मार्गदर्शन होणार आहे.तसेच दि.९ ऑक्टोबर २०२२ रोजी सईद नगर,भोकर येथून जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ईदगाह मैदानावर या मिरवणूकीची सांगता होणार आहे.मिरवणूकीच्या सांगतेनंतर लगेच अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले आहे.
‘ईद ए मिलाद उन नबी’ उत्सव साजरा करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी हमिद खान पठाण तर उपाध्यक्षपदी मन्सूर खान पठाण यांची निवड

‘ईद ए मिलाद उन नबी’ निमित्त उपरोक्त उल्लेखील्या प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी नुकतीच ईद ए मिलाद समितीची स्थापना करण्यात आली आहे.समिती स्थापनेच्या अनुशंगाने मशिद ए आयेशा (र.जि), सईद नगर भोकर येथे भोकर नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षांचे प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते शेख युसूफ,रा. काँ.पा.चे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक शेख जवाजोद्दीन बरबडेकर,माजी नगरसेवक शेख वकील शेख खैराती, हाजी इद्रिस सेठ,माजी नगरसेवक शेख मकसूद गोंदवाले,बाबुभाई तामसेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमिजोद्दीन उर्फ खाजु इनामदार,माजी नगरसेवक खाजा तौफिक इनामदार,तौसिफ इनामदार,सनावोद्दीन इनामदार, सामाजिक कार्यकर्ते शेख नाजीम भाई,शमीमोद्दीन इनामदार,शेख अतीख,शेख रफिक,मुमताज मल्लेवाले,बाबा खाॅन पठाण,जुनेद पटेल, शेख करीम करखेलीकर,शेख एजाज,निजामबाबा,शेख अर्शद,आसीफ शेख,अतिख इनामदार,शफी पटेल,यांसह आदी प्रतिष्ठित मुस्लीम बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.यावेळी सर्वानुमते ईद ए मिलाद समिती निवडण्यात आली.निवडण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार हमिद खाॅन पठाण,उपाध्यक्षपदी मन्सूर खान पठाण कोळगावकर व सचिव पदी एजास शेख यांची निवड करण्यात आली आहे.तर सदस्यपदी अनेकांची निवड करण्यात आली असून उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व उपरोक्त कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.तर उपरोक्त उल्लेखीत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार असून या कार्यक्रमात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सदरील ईद ए मिलाद समितीच्या वतीने करण्यात आले आहे.