Mon. Dec 23rd, 2024

अ‍ॅड.खाडे मित्रमंडळाने केला संदीप पाटील गौड यांचा वाढदिवस साजरा

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भोकर शहरातील सामाजिक,राजकीय व विविध क्षेत्रात सदैव सेवारत असलेले एक सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून सर्वपरिचित युवा नेतृत्व संदिप गोविंदराव पाटील गौड यांचा वाढदिवस भोकर येथील प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड.रवि खाडे व मित्रमंडळाच्या वतीने दि.४ ऑक्टोबर रोजी विविध लोकोपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भोकर येथील सेवाभावी युवा व्यक्तीमत्व संदिप गोविंदराव पाटिल कोंडलवार गौड यांचा जन्मदिवस तिथी प्रमाणे विजयादशमीच्या पुर्वसंध्येला आहे.त्याच मंगल औचित्याने दि.४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड.रवि खाडे व मित्रमंडळाच्या वतीने अ‍ॅड. रवि खाडे यांच्या कार्यालयात वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संदीप पाटील गौड यांचा अ‍ॅड.रवि खाडे व भोकर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.सिद्धार्थ जी.कदम,उपाध्यक्ष अ‍ॅड.भुजंग सुर्यवंशी, अ‍ॅड.परमेश्वर पांचाळ,अ‍ॅड.पवन वच्चेवार,अ‍ॅड.आर.के.चव्हाण,अ‍ॅड.ए. जे.येरेकर,अ‍ॅड.शेख अल्तमश,अ‍ॅड.सचिन जाधव,अ‍ॅड.प्रसनजित एडके, अ‍ॅड.मंगेश पी.पेदे,अ‍ॅड.प्रकाश मेडके,अ‍ॅड.शेख अशफाक,अ‍ॅड.पेरके, अ‍ॅड.के.जे.राठोड,अ‍ॅड.एल.एल.मोरे,अ‍ॅड.व्हि.एस.कल्याणकर यांसह आदी मित्रमंडळींनी शॉल,पुष्पहार देऊन व पेढे भरवून उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन यथोचित सत्कार केला.

तर शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करतांना अ‍ॅड.रवि खाडे म्हणाले की, संदिप पाटील गौड यांचे वडील माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांनी तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले असले तरी राजकारणापेक्षा समाज कार्य,समाजसेवेला त्यांनी अधिक महत्त्व दिले आहे.त्यांनी गोरगरिब,शेतकरी व कष्टकऱ्यांची सेवा करण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे.त्यामुळेच जनतेने त्यांना भोकर नगरीचे उपनगराध्यक्ष व तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी विराजमान केले आणि जनसेवेची संधी दिली.त्याच जनसेवेचा वारसा संदिप पाटील गौड हे आपल्या सेवेतून चालवित आहेत.तसेच रात्री अपरात्री स्वतःचे वाहन देऊन रुग्णसेवा ही करत आहेत.त्यामुळेच सर्व जाती,पंथ व धर्माची मित्रमंडळी आणि लोक त्यांच्याशी जोडली गेली आहेत. पुढील काळात त्यांच्या हातून अशीच जनसेवा घडो व त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य मिळो,अशा मनःपुर्वक अनंत मंगल कामना आम्हा सर्वांच्या वतीने मी देतो,असे ही ते म्हणाले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !