बिल्किस बानो बलात्कार प्रकरण पुनश्च जलदगती न्यायालयात चालवा
तसेच आरोपिंच्या कठोर शिक्षेसाठी वंचित बहुजन आघाडीने भोकर मध्ये राबविली स्वाक्षरी मोहीम
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मा.न्यायालयाने बलात्कार व निर्घुण हत्या करणा-या ११ गुन्हेगारांची शिक्षा गुजरात सरकारने माफ केली व त्या नराधमांना मोकाट सोडण्यात आले. ही बाब अतिशय गंभीर असून आरोपींचे मनोबल वाढविणारी व पिडीतांवर अन्याय आणि खच्चीकरण करणारी असल्याने सदरील गु्हे प्रकरण पुनश्च जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे.तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी मोहिम राबवून मा.सर्वोच्च न्यायालयास त्या स्वाक्षरी अहवालाचे विनंतीपत्र पाठविण्यात यावे असे आवाहन केले आहे.यास प्रतिसाद देत दि.२ ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे स्वाक्षरी मोहिम आंदोलन करण्यात आले आहे.
केंद्र शासन देशात दलित -मुस्लिम विरोधी नवनवीन कायदे तयार करत असून ही बाब गंभीर असल्याने वंचित बहुजन आघाडी या धोरणांचा तीव्र विरोध करत आहे.तसेचत्रदलित,मुस्लीम, बहुजनच्या नाय हक्कासाठी सदैव लढा देत आहे.काम करत आहे.गुजरात मधील एका मुस्लिम महिलेवर बलात्कार करून तिच्या ३ वर्षीय मुलाची व कुटुंबियांची हत्या करणाऱ्या आरोपीस मा.न्यायालयाने जन्मपेठेची शिक्षा सुनावली आणि त्या अकरा नराधम आरोपींना काही दिवसापूर्वी मोकाट सोडून ही दिले आहे. एकीकडे शासन बेटी बचाओ बेटी बढाओ चा नारा देत आहे तर दुसरी कडे गुजरात सरकार ने बलात्कार व हत्ये मध्ये सामील असलेल्या अकरा आरोपींना न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा माफ करत शिक्षा भोगत असलेल्या त्या ११ नराधम आरोपींना माफी दिली.बलात्कार व हत्ये मध्ये सामील असलेल्या आरोपींना सोडणे म्हणजे पिडीतेवर एका प्रकारे अत्याचार करण्याचाच प्रकार आहे.त्यामुळे गुन्हेगारांना पाठबळ मिळाल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढेल.तसेच पिडीता बिल्किस बानोवर अन्याय होईल.असे होऊ नये म्हणून त्या आरोपींची शिक्षा माफ न करता हे गुन्हे प्रकरण पुनश्च जलदगती न्यायालयात चालवून त्यांना दिलेली शिक्षा पुर्ववत कायम ठेवण्यात यावी.या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर सात दिवस स्वाक्षरी मोहिम राबविण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे.

याच अनुषंगाने त्या आवाहनास प्रतिसाद देत दि.२ ऑक्टॉबर २०२२ रोजी वंचित बहुजन आघाडीचे भोकर तालुका अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भोकर शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात उपरोक्त मागणी संदर्भाने स्वाक्षरी मोहीम आंदोलन करण्यात आले. सदरील स्वाक्षरी अहवाल दि.३ ऑक्टॉबर २०२२ रोजी भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायलायाचे न्यायाधीश यांच्या मार्फत मा.सर्वोच्च न्यायालयास विनंतीपर पत्रासह पाठविला जाणार आहे.या मोहिमेला भोकर शहरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत यामध्ये आपला सहभाग नोंदविला व त्या नराधम आरोपींची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी मुख्य न्यायमूर्ती,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली यांच्याकडे याद्वारे विनंती करण्यात येणार आहे.सदरील स्वाक्षरी मोहीम आंदोलन यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष सुनील कांबळे,महासचिव साईनाथ हामंद,तालुका उपाध्यक्ष शेख शब्बीर,विलास सावळे,सचिव मारोती वाघमारे,राजु दांडगे, संपर्कप्रमुख गजानन ढोले,शहराध्यक्ष शेख अजीम,शहर उपाध्यक्ष अंकुश चव्हाण,शेख मझहर,शेख अरशद,शहर सचिव यशवंत जाधव,शहर संघटक श्रीनिवास कदम,रहीम पठाण यांसह आदींनी सहभागी होऊन परिश्रम घेतले.