Mon. Dec 23rd, 2024

विज पडून मृत्यू झालेल्या दोन कुटूंबियांना प्रत्येकी ४ लाखाचा निधी वाटप

Spread the love

भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे यांनी पिंपळढव व दिवशी खु.येथील दोन मयतांच्या कुंटूंबियांना दिला शासनाच्या सानुग्रह निधीचा धनादेश

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : तालुक्यातील मौ.पिंपळढव व मौ.दिवशी खु. येथील शेतकरी महिलांचा परतीच्या पावसात विज पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या आस्मानी संकटग्रस्त दोन कुटूंबियांना शासनाच्या सानुग्रह निधीचा प्रत्येकी ४ लाख रुपये निधीचा धनादेश दि.२९ सप्टेंबर रोजी भोकरचे प्र.उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी वाटप केला आहे.

विजेच्या कडकडाटासह झालेल्या परतीच्या पावसात विज पडून दि.८ सप्टेंबर २०२२ रोजी मौ.पिंपळढव ता.भोकर येथील शेतकरी महिला ललिता सुभाष पोले(३८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.तर दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी मौ.दिवशी खु.येथील शेतकरी महिला वर्षा शंकर तीगलवाड (४०) यांचा मौ.लगळूद शिवारातील त्यांच्या शेतात विज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.या आस्मानी संकटग्रस्तांना शासनाचा सानुग्रह निधी मिळावा म्हणून महसूल विभागास तहसिल कार्यालयाने पाठविलेल्या अहवालानुसार निधी मंजूर झाला.त्या सानुग्रह निधीचे प्रत्येकी ४ लाख रुपयाचे धनादेश तहसिलदार राजेश लांडगे यांनी उपरोक्त दोन संकटग्रस्त कुटूंबितील मयत महिलेचे पतीअनुक्रमे सुभाष नारायण पोले,पिंपळढव व शंकर रामलू तिगलवाड,दिवशी खु.आणि कुटूंबीय यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात वाटप केले.

यावेळी नायब तहसिलदार रेखा चामनर,सभापती जगदीश पाटील भोसीकर, माजी सभापती तथा संचालक बाळासाहेब पाटील रावनगावकर,तलाठी नामदेव मुळेकर,तलाठी राजू चव्हाण,लिपिक सिद्धार्थ सोनसळे,संचालक राचंद्र मुसळे, साहेबराव भोंबे,संपादक उत्तम बाबळे,पत्रकार राजेश वाघमारे, शंकर कदम,सुभाष नाईक,आनंद ढवळे,रमेश पोलकमवार यांसह त्या गावांतील प्रतिष्ठित नागरीकांची उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !