Sat. Dec 21st, 2024

मेळघाटच्या तुलनेत आपण सकस आहार उपलब्धतेत खुप सुदैवी आहोत-राजेश लांडगे

Spread the love

हरी तांडा येथे अंगणवाडी व वर्ल्ड व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा आणि आहार प्रात्यक्षिक शिबिराचे करण्यात आले होते आयोजन

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : आपला भारत देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे,तरी पण मेळघाट सारख्या आदिवासी भागात आजही दीड- दीडशे मुले अज्ञान व सकस आहारा अभावी कुपोषणामुळे मरतात.ही फार मोठी शोकांतिका आहे.परंतू आपल्या राज्यात सकस आहार सर्वत्र मुबलक व सहज मिळू शकतो.त्यामुळे मेळघाटच्या तुलनेत आपण सकस आहार उपलब्धतेत खुप सुदैवी आहोत.या आहारांचा सद्उपयोग करुन आपण कुपोषण मुक्त होऊया,असे मनोगत प्र.भोकर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय पोषण आहार महा-२०२२ अनुशंगाने अंगणवाडी व वर्ल्ड व्हिजन इंडिया या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध स्पर्धा आणि पोषण आहार प्रात्यक्षिक शिबिरात प्राथमिक शाळा हरी तांडा ता.भोकर येथे ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

प्राथमिक शाळा हरी तांडा ता.भोकर येथे दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता अंगणवाडी व वर्ल्ड व्हिजन इंडिया या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा आणि पोषण आहार प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदरील शिबिराच्या अध्यक्षस्थानी धानोरा-हरी तांडा गावच्या सरपंच सौ.वंदना राजेश्वर करपे या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र. भोकर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे,गटविकास अधिकारी अमित राठोड,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल शिवशेट्टे,वर्ल्ड व्हिजने व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू,गटशिक्षणाधिकारी वाघमारे,शिक्षण विस्तार अधिकारी शेख जकीयोद्दीन बरबडेकर,डॉ.मनिषा भाले, संपादक उत्तम बाबळे,जेष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ यांसह आदींची उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी रांगोळी स्पर्धा,अंगणवाडी सजावट व सकस पोषण आहार प्रात्यक्षिकांची पाहणी केली आणि उत्कृष्टरित्या केलेल्या या आयोजनाचे कौतुक केले.

शिबिराच्या प्रास्ताविकात एकात्मिक बाल विकास अधिकारी राहुल शिवशेट्टे यांनी शिबिराची पार्श्वभूमी विषद केली व कार्यालया मार्फत हे शिबीर घेण्यासाठी कसलीही सक्ती नसतांनाही अंगणवाडी सेविका,मदतनीस व आशा वर्कर यांनी हे शिबीर जनजागृतीसाठी स्वयंस्फुर्तीने आणि स्वखर्चाने घेतले आहे.तसेच यात वर्ल्ड व्हिजनचे खुप सहकार्य असल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.तर यावेळी गटविकास अधिकारी अमित राठोड यांनी आपल्या मनोगतातून वैज्ञानिकदृष्ट्या फळाचे रंग व त्यातील प्रोटिनांचा परिचय करुन देत शरीर सदृष्ठतेसाठी त्या आहारांचे सेवन आणि महत्व विषद केले.तर डॉ.मनिषा भाले यांनी उपस्थित महिला,अंगणवाडी सेविका व किशोर वयीन मुलींना शरीर सदृष्ठतेसाठी लागणारे सकस आहार व सेवनाविषयी योग्य असे मार्गदर्शन केले.तसेच तहसिलदार राजेश लांडगे बोलतांना पुढे म्हणाले की,पुरुषापेक्षाही महिला अधिक काबाडकष्ट करतात.तसेच काही कुटूंबातील महिला सर्वांना पोटभर जेवण करु घालतात व स्वतः मात्र उरलेले,शिळेपाते असे निकृष्ट दर्जाचे जेवण करतात. त्याचा परिणाम अशा प्रकारे जेवण करणाऱ्या महिलांच्या शरीरावर होतो व यातून निर्माण होणारी संतती ही कुपोषित जन्माला येऊ शकते.त्यामुळे गरोदर मातांनी,महिलांनी नियमितपणे सकस व पौष्टिक आहाराचे सेवन करावे,तरच भविष्यात जन्माला येणारी बालके कुपोषित होणार नाहीत, असे ही ते म्हणाले.तर अध्यक्षीय समारोप सौ.वंदना राजेश्वर करपे यांनी केला.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय पोषण आहार महा-२०२२ अनुशंगाने उपक्रमात उत्तम काम बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर व विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करणारे, प्रसिद्धी देऊन जनजागृती करणारे पत्रकार यांचा वर्ल्ड व्हिजन इंडिया शाखा भोकरच्या वतीने व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू यांनी मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान केला.यात भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे, सचिव बालाजी नार्लेवाड,कमलाकर बरकमकर,विठ्ठल सुरलेकर आणि मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष बी.आर.पांचाळ यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.पंडित ताई यांनी केले.तर शिबिराच्या यशस्वितेसाठी अंगणवाडीच्या सेविका सौ.रेणूका कैरमकोंडा,सौ.वंदना गंगाधर राव,सौ.जारंडे यांसह आदीजण व वर्ल्ड व्हिजनचे रतिलाल वळवी,पुनम जाधव,इमा गावीत यांसह प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद आणि गावकऱ्यांनी परिश्रक्ष घेतले.या शिबिरास भोकर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस,सुपरवायझर,आशा वर्कर, शिक्षक वृंद,पत्रकार व किशोर वयीन मुली,गावकरी महिला व पुरुषांची बहुसंख्येने उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !