Mon. Dec 23rd, 2024

स्मृतीशेष प्रवीन वाघमारे यांच्या स्मृती दिनानिमीत्त मोफत आरोग्य शस्त्रक्रीया शिबीर

Spread the love

भोकर येथे २५ सप्टेंबर रोजी डॉक्टर्स व केमिस्ट असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने होत आहे हे शिबीर

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : येथील डॉक्टर्स व केमिस्ट असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतीशेष प्रवीन वाघमारे यांच्या ७ व्या पुण्यस्मृती दिनाचे औचित्य साधुन भोकर येथे दि.२५ सप्टेंबर रोजी हायड्रोसिल,हर्निया,अंपेडिक्स व शरीरावरिल गाठी यांची मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

स्मृतीशेष प्रवीन वाघमारे यांच्या ७ व्या पुण्यस्मृती दिनाचे औचित्याने रविवार,दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या वेळेदरम्यान यश हॉस्पिटल, पंचायत समिती समोर भोकर जि.नांदेड येथे उपरोक्त आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन डॉ.दिलीप फुगारे (सर्जन)- वैद्यकिय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मुदखेड यांच्या हस्ते होणार असून यावेळी डॉ.अशोक मुंढे- वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर,डॉ.जीवन पावडे (सर्जन) नांदेड,डॉ. आकाश देशमुख- जिल्हा हिवताप अधिकारी नांदेड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तर या शिबिरात डॉ.जीवन पावडे(सर्जन),डॉ.रामेश्वर भाले (भुलतज्ञ),डॉ.श्रीकांत बोलेवार(एम.डी.मेडिसिन),डॉ.दिलीप फुगारे(सर्जन),डॉ.बाळासाहेब बिऱ्हाडे (भुलतज्ञ),डॉ.विजय करणवाड (एम.डी. मेडिसिन),डॉ.संतोष अंगरवार(सर्जन), डॉ.अस्मिता भालके (भुलतज्ञ ),डॉ.वसंत पांचाळ (मुळव्याध व भगंदर तज्ञ),डॉ.आनंद चव्हाण (भुलतज्ञ ) यांसह आदी तज्ञ डॉक्टर्स सहभागी होणार असून आरोग्य तपासणी करणार आहेत.

सदरील शिबिरामध्ये हायड्रोसिल,हर्निया,अपेंडिक्स व शरिरावरील गाठी यांची तपासणी करुन मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून यातील गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया ही भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार आहे.तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डाॅ.साईनाथ वाघमारे,केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशिएशन भोकरचे अध्यक्ष राजेश्वररेड्डी लोकावाड, डॉक्टर्स असोशिएशन भोकरचे अध्यक्ष डॉ.राम नाईक जाधव यांसह आदींनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !