गोविंद बाबागौड पाटील यांना ओबीसी समाज भुषण पुरस्कार घोषित
उद्या जिल्ह्यातील ८ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून गणवंत विद्यार्थ्यांच्या यथोचित सत्काराचे ही आयोजन- ओबीसी नेते नामदेव आयलवाड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : भारतीय पिछडा शोषित संघटन जिल्हा शाखा नांदेड,ओबीसी कर्मचारी समन्वय समिती व ओबीसी समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने ओबीसी(VJNT, NT-B,C,D;SBC,etc)समाजाच्या एकजुटीसाठी, विकासासाठी आणि उन्नतीसाठी विविध प्रकारे आंदोलने करुन योगदान दिले आहे अशा नांदेड जिल्ह्यातील ८ मान्यवरांना दि.११ सप्टेंबर रोजी ओबीसी समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून या मान्यवरात भोकरचे माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील कोंडलवार यांचा ही समावेश आहे.या मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा ही यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष तथा नेते नामदेव आयलवाड यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी प्रवर्गाच्या एकजुटीसाठी, विकासासाठी,उन्नतीसाठी शासनदरबारी आणि विविध क्षेत्रात न्याय मिळवून देण्यासाठी निवेदने,धरणे,उपोषण, मोर्चा अशा प्रकारे विविध आंदोलने करुन योगदान दिले आहे.असे काही मान्यवर नांदेड जिल्ह्यात आहेत.त्याच्या समासेवी कार्याची भारतीय पिछडा शोषित संघटन जिल्हा शाखा नांदेड,ओबीसी कर्मचारी समन्वय समिती व ओबीसी समन्वय समितीने दखल घेतली असून या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,दि.१२सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता शिवपार्वती मंगल कार्यालय,भावसार चौक, मालेगाव रोड,नांदेड येथे एका भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘ओबीसी समाज भुषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्कारार्थीत भोकर पंचायत समितीचे माजी सभापती, माजी उपनगराध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील कोंडलवार यांसह आर.के.दाभडकर, गंगाधरराव शिकारे,विश्वनाथजी कोलमकर,पी.पी. बंकलवाड,लक्ष्मण शिरसागर,शिवरामजी पांचाळ आणि रामेश्वर गोडसे महाराज यांचा समावेश आहे.याच बरोबर या सोहळ्यात ओबीसी समाजातील इयत्ता दहावी व बारावी मध्ये ८० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या यशवंत,गुणवंत आणि एमबीबीएस,आयआयटी शिष्यवृत्तीधारक,नवोदय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा ही यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत.
या पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नागनाथराव देशमुख लोहगावकर हे राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून नांदेड मनपाचे माजी स्थायी समिती सभापती नंदकुमारजी कोसबतवार हे राहणार आहेत.तर ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,उद्योजक बालाजीराव इबितदार,गोविंदराम सुरवर,राष्ट्रीय अध्यक्ष एस.जी. माचनवार यांच्या हस्ते उपरोक्त पुरस्काराचे वितरण होणार आहे.याप्रसंगी ओबीसी समाजातील शैक्षणिक समस्या व समाजाची भूमिका यावर औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध विचारवंत सुदाम चिंचानेजी हे मार्गदर्शन करणार आहेत, तरी या सोहळ्यास ओबीसी समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहून ओबीसी समाज संघटन शक्तीचे विराट दर्शन घडवावे,असे आवाहन सोहळा आयोजन समितीच्या करण्यात आले असून सदरील सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गोविंद भाऊ फेसाटे,बालाजी खर्डे पाटील,नागनाथराव देशमुख,व्यंकट पुरवार,नागनाथराव चिटकुलवार,प्रकाश राठोड,विजय देवडे,राजेश चिटकुलवार,गंगाधर मावले, चंद्रकांत दामेकर,संजय पेटकर,रवि बंडेवार,विनोद सुत्रावे, सतिशचंद्र शिंदे,दत्ता चापलकर,गंगाधर नंदेवाड,बी.डी. जाधव,व्यंकट चिलवरवार,गणेश भुसा,लक्ष्मणराव लिंगापुरे, ॲड.प्रदीप राठोड,बजरंग तेलंग,प्रा.श्रीमंत राऊत,प्रा.दिलीप काठोडे,बाबाराव विश्वकर्मा,संजय पांचाळ,सुरेश चंदावाड, प्रा.साहेबराव बेळे,ॲड.साहेबराव चव्हाण,प्रल्हाद राठोड, गिरीश गरुडकर,नागभुषण दुर्गम,वाय.जी.देवकर,भगवान संपतवार,विजय इंदुरकर,बळीराम राऊत,व्यंकट जाधव,प्रा. इंदोरेसर,कृष्णराव चिंतलवार,संदीप जिल्लेवाड,प्रा.मारोती लुटेसर,उध्दव मुंगरे,ओमेश पांचाळ,नागनाथ हुंडे,संजय नक्कावार,तुकाराम मुंगरे,लक्ष्मणराव सुरकार,एल.बी. चव्हाण,गंगाधर निमलवाडसर,सुवर्णकार सर,मनोहर भंडेवार,अशोक पाटील सकनुरकर,मिथुन मंडलेवार, आयलाजी पंदीलवाड,बालाजी गादगे शिवदास सोळंके, संजय खांडरे,साहेबराव बुट्टनवाड,शिवराम श्रीरामवार, हनमंत काऊलवार,बाबुराव माडगे जिड्डेवारसर,संतोष गोपीनाथ,अरविंद पांचाळ, पंडीत तोटेवाड,राम बोरोडसर, रामदास केंद्रे,व्यंकटेश उकरंडे,माधव परगेवार,सिध्देश्वर मठपती,शिवशंकर पिंपळे,आनंद शिनगारे,बाबाराव जरगेवाड,पाराजी पोले,राजेंद्र पाटिल,बाबुराव कापसे,डी. एस.धात्रक,सचिन रामदीनवार,संजय मोगडपल्ले,नागनाथ महादापुरे,सुशिल गिरी,स्वप्नील रामगिरवार,नामदेव पांचाळ, मनोहर राठोड,बाळु राऊत,बालाजी कोंडामंगल,गोपाल बंड्रेवार,प्रमोद फुलारी,आकाश क्षीरसागर,व्यंकट बंड्रेवार, सत्यनारायण पांचाळ,गणेश यादव,नारायण पांचाळ,संतोष नागनीकर,संजय मल्लेवार,अवधुतवार,श्रीरामवार, कौडगावेसर,दिगंबर मरकंटे,शिवाजी बरबडकर,श्याम दादजवार,नारायण पनकंटीवार,विठ्ठलराव माचनवार,संदीप मस्के,जानतेसर,कानगुलवार,विठ्ठल मुखेडकर,मेघावत राठोड,देवा झपाटे,साईनाथ पेरेवार,माधव माचनवार,अनिल राठोड,प्रा.योगेश अंबुलगेकर,अशोक राठोड,सदानंद साबळे, संजय मरडे,गोविंद भुसलवाड,बारदेवाड,प्रकाश कारलेवाड, प्रमोद आटकेलवार,संतोष दासरवार,अशोक उडतलवार, प्रमोद जकुलवार,मनोज आऊलवार,श्रीनिवास आटलावार, पद्मा झंपलवाड,ललीता कुंभार,दैवशाला पांचाळ,चंद्रकला चापलकर,जयश्री यशवंतकर,अरुणा पुरी,गोदावरी जंगिलवाड,भावसार मॅडम,भाग्यश्री सुरनर यांसह आदीजण परिश्रम घेत आहेत.
माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील कोंडलवार व सर्व पुरस्कारार्थी मान्यवरांचे संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने अगदी मनापासून हार्दिक अभिनंदन आणि भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा !