Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शहरात शालेय शिक्षण घेत असलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळविल्याची घटना दि.७ सप्टेंबर रोजी घडली असून याप्रकरणी एका अज्ञाताविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकर शहरात शिक्षण घेत असलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून फुस लाऊन दि.७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान तिच्या घरुन पळवून नेले आहे.तिला पळवून नेतांना तिच्या घरातील दाग दागिने,एटीएम कार्ड व मोबाईल देखील त्यांनी नेला आहे.कुटूंबियांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला,परंतू ती न सापडल्याने तिच्या आईने याबाबत दि.७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी रितसर फिर्याद दिली.यावरुन रात्री उशिरा एका अज्ञाता विरुद्ध गुरनं.३४७/२०२२ कलम ३६३ भादवि प्रमाणे फुस लाऊन पळवून नेल्याचा गुन्हा भोकर पोलीसात दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्हा सहाय्यक पो.उप.नि.एम.डब्ल्यू.दवणे यांनी दाखल केला असून पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप.नि.अनिल कांबळे हे करत आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !