माजी उपप्राचार्य पांडूरंग तोडे पंचतत्वात विलीन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : शहिद प्रफुल्ल नगर,भोकर येथील रहिवाशी सेवानिवृत्त माजी उपप्राचार्य तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा भोकरचे अध्यक्ष पांडूरंग माधवराव तोडे(६६)यांचे अल्पशा आजाराने नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान बुधवार,दि.३१ ऑगस्ट २०२२ पहाटे १:०० वाजताच्या दरम्यान दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर दि.३१ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २:०० वाजता बौद्ध स्मशान भूमित भोकर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कार समयी प्रथम समता सैनिक दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली व बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने पुष्पचक्र अपर्ण करून आदरांजली वाहण्यात आली.यानंतर जेष्ठ पत्रकार एल.ए.हिरे,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान दडवे,अशोक जाधव,उपप्राचार्य संजय सावंत कामनगावकर,रविकीरण जोंधळे,भिमराव दुधारे यांनी आदरांजलीपर शोक भावना अर्पित केली. यावेळी बौद्ध महासभेचे के.एन.माने,सुरेश लोकडे,सा.ना. भालेराव,सुभाष नरवाडे,बालाजी वाघमारे,आनंदराव पाटील बोरगावकर,प्रा.डॉ.टी.एच.शेख,प्रा.डॉ.जे.टी.जाधव,माजी नगरसेवक मनोज गिमेकर,पत्रकार बी.एस.सरोदे,संपादक उत्तम बाबळे,भीमशाहिर साहेबराव येरेकर,बाबूराव गाडेकर, साहेबराव मोरे,भिमराव वाघमारे,डॉ.साईनाथ वाघमारे,डॉ. विजयकुमार दंडे,उज्वल केसराळे,जितेंद्र देशमुख,दिलीप के.राव,अब्दुल सलिम,पत्रकार सिद्धार्थ जाधव,यांसह नातेवाईक,आप्तेष्ठ,विविध प्रतिष्ठित नागरिक,कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी,शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं,तीन मुली,जावाई,सुन, नातवंडे असा मोठा परिवार असून ते ग्रामसेवक धम्मपाल तोडे यांचे वडील आणि भोकर तहसील कार्यालयातील कर्मचारी गंगाधर चव्हाण यांचे सासरे होत.
तोडे परिवाराच्या दु:खात सहभागी असून संपादक उत्तम बाबळे व परिवाराची त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली!💐💐💐