Sat. Apr 19th, 2025

नांदेड जिल्हा शिवसेना प्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांचा उद्या भोकर मध्ये सत्कार

Spread the love

शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे-जेष्ठ शिवसैनिक शिवाजीराव पाटील किन्हाळकर यांचे आवाहन

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची नुकतीच नांदेड जिल्हा शिवसेना प्रमुख पदी नियुक्ती झाली असून या औचित्याने उद्या दि.१ सप्टेंबर रोजी भोकर येथे भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या सत्कार सोहळ्यास बहुसंख्येने शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जेष्ठ शिवसैनिक शिवाजीराव पाटील किन्हाळकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर असंख्य निष्ठावंत सच्चा शिवसैनिकांनी शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची साथ कदापिही सोडली नाही.त्या निष्ठावंत शिवसैनिकांतील एक नाव म्हणजे हदगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय नेते माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर होय. शिवसेना फुटीनंतर ही शिवसेना पक्ष प्रमुख यांना भक्कम साथ देत नांदेड जिल्ह्यातील सच्चा शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात एकसंघ बांधणी करण्यासाठी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पुढाकार घेतलेला आहे.याची दखल घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नागेश पाटील आष्टीकर यांची नांदेड जिल्हा शिवसेना प्रमुख पदी नुकतीच नियुक्ती केली आहे.

नागेश पाटील आष्टीकर यांच्या या नव नियुक्तीने नांदेड जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना मोठे बळ मिळाले असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.नांदेड जिल्हा शिवसेना प्रमुख पदाची जबाबदारी घेतल्यानंतर ते दि.१ सप्टेंबर २०२२ रोजी भोकर येथे येत आहेत.भोकर तालुक्यातील त्यांचा हा पहिलाच दौरा असल्यामुळे शिवसैनिकांच्या वतीने सकाळी १०:०० वाजता माऊली मंगल कार्यालय,किनवट रोड भोकर येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते सर्व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.याच बरोबर या सोहळ्यास शिवसेना नेतज माजी खासदार सुभाषराव वानखेडे व जिल्ह्यातील आदी जेष्ठ शिवसैनिकांची उपस्थिती राहणार आहे.तरी या सोहळ्यास भोकर तालुका व शहरातील सर्व शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन जेष्ठ शिवसैनिक शिवाजीराव पाटील किन्हाळकर यांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !