शहीद गोविंद कांबळे व जनार्दन कसारे यांच्या मारेकर्यांना फाशी द्यावी!
अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य व विविध समाजसेवींची मागणी…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : पुरोगामी महाराष्ट्रातील मातंग-दलित समाजावर दिवसेंदिवस खून,बलत्कार,जीवघेणे हल्ले,सामाजिक बहिष्कार टाकणे अशा अन्याय अत्याचाराच्या असंख्य घटना होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.अशातच मौ. सिंगणापूर ता.जि.परभणी येथील मातंग तरुण गोविंद मोतीराम कांबळे यांचा पुर्वाश्रमीच्या शाब्दीक वादाचा रोष मनात धरुन गावातील जातीयवादी धनदांडग्यांनी सामूहिक हल्ला करुन खून केला.तसेच अॅट्रॉसिटीचा दाखल गुन्हा माघे घेत नसल्याने जनार्धन कोंडिबा कसारे रा.साईनगर,पिसादेवी जि.औरंगाबाद(छत्रपती संभाजी महाराज नगर) या गायरान धारक मातंग वृध्द शेतक-याचा कुर्हाडीचे घाव घालून त्यांच्याच शेतात निर्घुण खून करण्यात आला आहे.या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेसह विविध समाजसेवींनी केली असून दि.२२ ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन राज्य शासन व संबधितांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
बिलोली जि.नांदेड येथील मातंग समाजातील मुकबधीर मुलींवर बलात्कार करुन तिचा निर्घुण खून करण्यात आला. माळवाडी (बोरगांव) जि.सोलापूर येथील मातंग समाजाच्या साठे कुटुंबातील मयत व्यक्तीचा अंत्यविधी स्मशानभूमीत करु न दिल्यामुळे ग्रामपंचायती पुढे अंत्यविधी करावा लागला.पुणे शहरातील प्रधुन्म्य कांबळे या मातंग युवकाची जातीय मानसिकतेतुन निघूर्ण हत्या झाली,मौ.लोणी (खु.) ता.रिसोड जि.वाशिम येथील मातंग समाजावर जिवघेणा भ्याड हल्ला झाला,उमरखेड येथील डॉ.हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या झाडून भरदिवसा हत्या झाली,औरंगाबाद शहरातील मनोज आव्हाड या मातंग तरुणाची अमानुषपणे मारहाण करुन निर्घुण हत्या केली,अशा प्रकारे मातंग समाजावर अन्याय,अत्याचार,खून,छळ,बहिष्काराच्या शेकडो घटना घडल्याचे प्रकरणे ताजे असतांनाच मौ. सिंगणापूर ता.जि. परभणी येथील मातंग तरुण गोविंद मोतीराम कांबळे यांचा मागील झालेल्या शाब्दिक वादाचा रोष व जातीय खुन्नस मनात धरून त्याच गावातील जातीयवादी धनदांडग्या गुंडांनी मिळून सामूहिक हल्ला करुन निर्घुण खून केला.याच बरोबर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटीचा) कायदा प्रमाणे दाखल केलेला गुन्हा माघे घेत नसल्याचे कारण दाखवून जनार्धन कोंडिबा कसारे रा.साईनगर,पिसादेवी जि. औरंगाबाद(छत्रपती संभाजी महाराज नगर) या गायरान धारक मातंग वृध्द शेतक-याचा कुर्हाडीचे घाव घालून त्यांच्याच शेतातच खून करण्यात आला.तसेच मौ.ढाकणी जि.नांदेड येथील रहिवाशी सोनाजी कांबळे व त्याच्या पत्नीस स्वतःच्या घरातून हाकलून लावून गंभीररित्या मारहाण केल्यामुळे व हा अपमान सहन न झाल्याने नैराश्यातून सोनाजी कांबळे यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राषण केले आहे.
उपरोक्त अन्याय अत्याचाराच्या विविध घटनांवरुन असे निदर्शनास येत आहे की,पुरोगामी महाराष्ट्रात मातंग समाज कुठेच सुरक्षित नाही.परंतु राज्यकर्ते,शासन,प्रशासन,पोलीस यंत्रणायाबाबीकडे पूर्णता डोळेझाक करीत आहे.या अन्यायी घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आणि नुकतेच झालेल्या या अन्यायकारक घटनांतील आरोपींची सखोल चौकशी करुन त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.तसेच उपरोक्त उल्लेखीत सर्व घटनेतील मातंग समाजातील पिडीत व मयत व्यक्तींच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० लक्ष रूपये मदत तात्काळ जाहीर करावी,यासह आदी मागण्या घेऊन नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज व दलित बहुजन समाजातील विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी,समाजसेवी कार्यकर्ते यांच्या वतीने दि.२२ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड येथे ‘निषेध व धरणे आंदोलन’ करण्यात आले.तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत राज्य सरकार व सर्व संबंधितांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनात व निवेदन देणा-या शिष्टमंडळात अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे,उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार, चंपतराव हातागळे,मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले,संघमित्रा गवळे,मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष मालोजी वाघमारे,बहुजन क्रांतीदलाचे अॅड.बी.एम.गायकवाड,अॅड.शिवराज कोळीकर, प्रजासत्ताक पार्टीचे अॅड.बी.एम.बादलगावकर,भाजपा अनु. जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर कावडे,शंकरराव गायकवाड,प्रा.व्यंकट सूर्यवंशी,नागेश तादलापूरकर,माजी सैनिक भीमराव बल्लूरकर,सर्जेराव वाघमारे,आकाश बरूडे, विशाल कंधारे,बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडिले,अब्दुल गफार,माजी सैनिक यादवराव वाघमारे,सिटूचे कॉ.गंगाधर गायकवाड,अंनिसचे सम्राट हटकर,असंघटीत कामगार संघटना कॉ.शाम सरोदे,सिटूचे कॉ.जयराज गायकवाड,अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे मराठवाडा अध्यक्ष पिराजी गाडेकर,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल घाटे, आनंद वंजारे,यशवंत लखुंडे,जी.आर.सूर्यवंशी,कॉ.मारोती केंद्रे,कैलास गायकवाड यांसह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.