श्रमिक,शोषित,पिडीतांच्या वास्तव जीवन साहित्याचे संशोधक अण्णा भाऊ साठे-उत्तम बाबळे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : एखाद्या विषय घेऊन त्यावर प्रबंध लिहून उच्च शिक्षितांना विद्या वाचस्पती अर्थातच’पिएचडी’ होता येते.परंतू साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी कुठल्याही महाविद्यालयात शिक्षण न घेता स्व अनुभवातून श्रमिक,शोषित,पिडीतांच्या वास्तव जीवनावर संशोधन करुन साहित्यरुपाने अनेक प्रबंध जगासमोर ठेवले आहेत.त्यामुळे ते ख-या अर्थाने एक उच्च विद्या वाचस्पती,संशोधक व डॉक्टरेटच आहेत. म्हणून कोणतेही विद्यापीठ त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करो अथवा न करो ते जगमान्य व जनमान्य संशोधक तथा डॉक्टरेट आहेतच.असे मनोगत साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे यांनी दि.२१ ऑगस्ट रोजी मौ.नारवाट ता.भोकर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना व्यक्त केले.
मौ.नारवाट ता.भोकर येथे दि.२१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी ध्वजारोहण व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामदास जोंधळे हे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे व प्रमुख पाहुणे म्हणून शाहीर के.वाय.देवकांबळे,मानवहित लोकशाही पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष संजय वाघमारे बोथीकर,युवक ता.अध्यक्ष गजानन गाडेकर,उपसरपंच नागोराव झाडे,तंटामुक्ती अध्यक्ष भुजंगराव झाडे,श्रीरंग पाटील ढगे,चेअरमन देविदास पाटील ढगे,पो.पा.देविदास पाटील काळेवाड यांसह आदींची उपस्थिती होती.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी श्रीरंग पाटील ढगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.यावेळी एक चिमुकला विद्यार्थी जय जोंधळे,शाहीर के.वाय.देवकांबळे यांनी जयंती सोहळ्यास अनुसरुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना उत्तम बाबळे पुढे म्हणाले की,साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी कल्पनेचे पंख लाऊन कोणतेही लिखाण केले नाही.तर श्रमिक, शोषित,वंचित,पिडीत,दलित यांच्या सोबत राहून जे अनुभवलं,भोगलं,सोसलं तेच शब्दरुपाने वास्तव साहित्यातून मांडलं आहे.म्हणून त्यांच्या साहित्यात जीवंतपण आले असून ते एक जागतिक दर्जाचे महान साहित्यीक तथा विश्व साहित्यभुषण म्हणून नावलौकिकास आले आहेत.त्यांच्या साहित्यातील एक शब्द,ओळ,कवन, पोवाडा,पात्रे व कादंबरीवर संशोधन करुन आज अनेकजण पिएचडी घेत आहेत.असे असतांनाही घोषित डॉक्टरेट पदवी त्यांना बहाल करण्यास काही विद्यापीठ विलंब करत आहेत ही खंत आहे.त्यांनी ते लवकरात लवकर करावं,असे ही ते म्हणाले.
सदरील सोहळ्यास बहुसंख्य समाज बांधव,प्रतिष्ठित नागरिक,तरुण यांसह आदींची उपस्थिती होती.या सोहळ्याचे प्रास्ताविक व सुरेख असे सुत्रसंचालन प्रकाश चंद्रे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते तथा तलाठी नामदेव मुळेकर यांनी मानले.तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती सोहळा समितीचे अध्यक्ष अनंत भालेराव,सुनील करंदीकर,ओंकार करंदीकर,ओमसाई भालेराव,बाबुराव भालेराव,अविनाश मुळेकर यांसह आदींनी परिश्रम घेतले.