भाजपा महिला आघाडीच्या वतीने भोकरमध्ये झाले तिरंगा ध्वज वाटप
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने भोकर शहरातील कोळी गल्ली,म.गांधी चौक, महादेव मंदिर व वाल्मीक रुषी मंदिर परिसरात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत दि.१० ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सबंध देशात ‘हर घर तिरंगा – घर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविला जात असून या उपक्रमात अनेक सेवाभावी व संंस्था लोकसहभाग देत आहेत.याच अनुशंगाने भोकर तालुका व शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने भोकर.शहरातील कोळी गल्ली, म.गांधी चौक,महादेव मंदिर व वाल्मीक रुषी मंदिर परिसरात हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला आहे. भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा विजया घिसेवाड, युवती शहराध्यक्षा सुनीता राजुरकर,पूनम देशपांडे व सर्व महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तींनी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप अण्णा सोनटक्के,भाजपा भोकर तालुकाध्यक्ष किशोर पाटील लघुळकर,बाजार समिती संचालक गणेश पाटील कापसे,भाजपाचे जेष्ठ नेते प्रकाश मामा कोंडलवार,भाजपा शहराध्यक्ष विशाल माने, भाजपख तालुका सरचिटणीस बालाजी वाघमारे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्रीकांत किन्हाळकर,भाजपा युवा शहराध्यक्ष वेणू पाटील कोंडलवार,प्रशांत पोपशेटवार,यांसह सर्व आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात आले.तर सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्तींनी परिश्रम घेतले.