Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त भोकर तालुका मराठी पत्रकार संघाने राबविला हा राष्ट्रीय उपक्रम

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सबंध देशात ‘हर घर तिरंगा – घर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविला जात असून या उपक्रमात अनेक सेवाभावी व संंस्था लोक सहभाग देत आहेत.याच अनुशंगाने भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दि.९ ऑगस्ट रोजी भोकर तालुक्यातील झिंगारवाडी आणि सिताराम नाईक तांडा येथे ‘हर घर तिरंगा’ वाटप करुन या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.

भारतीय स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान व योगदान दिले आहे.त्यांच्या बलिदान व योगदानाचे स्मरण व्हावे आणि आपल्या देशाप्रती राष्ट्रप्रेम, एकता दर्शविता यावी या उदात्त हेतून भारतीय स्वातंत्र्याच्या (७५ वर्ष) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सबंध देशात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावून मानवंदना द्यावी यासाठी दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी दरम्यान ‘हर घर तिरंगा – घर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहे.हा उपक्रम स्वयंस्फुर्तीने प्रत्येक नागरिकाने स्वतः तिरंगा खरेदी करुन व लोकसहभागातून राबवावा असे आहे.हा उपक्रम देशप्रेम भावनेतून साजरा करावयाचा असला तरी दुर्गम भागातील वाडी तांड्यावरील अनेक गरिब व होतकरु नागरिक शहरात येऊन नाव नोंदणी करुन तिरंगा ध्वज खरेदी करु शकत नाहीत.अशा नागरिकांना ही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी करुन घेता यावे यासाठी अनेक सेवाभावी व्यक्तीमत्वे व संस्था स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन त्यांना तिरंगा ध्वज देत आहेत.शासन प्रशासनाने तसे आवाहन ही केले आहे.याच अनुशंगाने भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दि.९ ऑगस्ट २०२२ रोजी भोकर तालुक्यातील आदिवासी बहुलवसती झिंगारवाडी व सिताराम नाईक तांडा येथील नागरिकांना तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात येऊन ‘हर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात आला.

क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त भोकर तालुक्यातील झिंगारवाडी व सिताराम नाईक तांडा येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले आणि जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.यानंतर भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,कार्याध्यक्ष शेख लतिफ भाई,उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव,सचिव बालाजी नार्लेवाड,कोषाध्यक्ष गंगाधर पडवळे, अन्य पदाधिकारी कमलाकर बरकमकर,बालाजी कदम पाटील,विठ्ठल सुरलेकर,मो.सुजावोद्दीन,विशाल जाधव, गजानन गाडेकर,बोईवार यांसह आदींच्या हस्ते दोन्ही गावच्या नागरिकांना तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात आले. तसेच दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हे तिरंगा ध्वज सन्मान पुर्वक,सुरक्षित ठिकाणी व ध्वज संहितेचे पालन करुन हा राष्ट्रीय उपक्रम राबवावा असे आवाहन यावेळी पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले.तर हा उपक्रम झिंगारवाडी येथे यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रतिनिधी विनोद चव्हाण,ग्रामसेविका माधवी जाधव,तलाठी दीपिका गोजे,शिक्षक वंगाले,भंडरवाड,ग्रा.पं.सदस्य सुनील चव्हाण, कोतवाल दत्तराम चंचलवाड,अंगणवाडी सेविका विमलबाई भिसे यांनी आणि सिताराम नाईक तांडा येथील सरपंच सुशिलाबाई चव्हाण,माजी सरपंच जीवन नाईक चव्हाण, स्वस्त धान्य दुकानदार मधूकर चव्हाण,साहेबराव राठोड, आंगणवाडी सेविका देवकाबाई चव्हाण यांसह आदींनी परिश्रम घेतले.यावेळी जेष्ठ नागरिक धुरपतबाई चंपती भिसे,लिंबाजी गणपती झिंगरे,शोभाबाई संतोष झिंगरे, मारोती खुपसे,पुष्पा कामाजी भिसे याच बरोबर सिताराम नाईक तांडा येथील धर्मिबाई चव्हाण,दरुबाई राठोड,स्वस्त धान्य दुकानदार मधुकर चव्हाण,गोवर्धन चव्हाण,साहेबराव राठोड,राजेश राठोड,सुनिल चव्हाण यांसह आदी नागरिकांची उपस्थिती होती.दोन्ही ठिकाणी सुत्रसंचालन बालाजी नार्लेवाड यांनी केले.तर उपस्थितांचे आभार गंगाधर पडवळे यांनी मानले.

झिंगारवाडी आणि सिताराम नाईक तांडा येथील तिरंगा ध्वज वाटपाची काही क्षणचित्रे….


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !