Fri. Apr 18th, 2025

मौ.वसुर च्या जेष्ठ महिला श्रीमती शेवंताबाई कावडे यांचे दु:खद निधन

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

मुखेड : मौ.वसूर ता.मुखेड येथील जेष्ठ नागरिक श्रीमती शेवंताबाई लक्ष्मण कावडे(९५) यांचे दि.४ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६:१५ वाजताच्या दरम्यान वृद्धापकाळी दु:खद निधन झाले असून दि.५ ऑगस्ट २०२२ रोजी मौ.वसूर येथे दुपारी १:०० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्व.श्रीमती शेवंताबाई कावडे या चंद्रकांत लक्ष्मणराव कावडे यांच्या मातोश्री होत.तर अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक नेते सतिश लक्ष्मणराव कावडे व रामराव माणिका कावडे यांच्या काकू,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे नांदेड जिल्हाध्यक्ष गंगाधर कावडे यांच्या आजी आणि कोंडीबा रामराव घाटे यांच्या आई होत.त्यांच्या पश्चात २ मुले,२ मुली,सुना,जावई,नातु,पंतू असा मोठा परिवार आहे.श्रीमती शेवंताबाई कावडे या कावडे परिवार व गावातील जेष्ठ नागरिक होत्या.त्यांच्या जाण्याने कावडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या दु:खातून सावरण्याची शक्ती निसर्ग निर्मिक देवो,अशी प्रार्थना करतोत.संपादक उत्तम बाबळे व परिवार कावडे परिवाराच्या दु:खाद सहभागी आहे.स्व.मातोश्रीस भावपुर्ण श्रद्धांजली!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !