Mon. Dec 23rd, 2024

वर्ल्ड व्हिजनच्या स्तनपान सप्ताह प्रचार रथाचा अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : वर्ल्ड व्हिजन इंडिया सेवाभावी संस्था ही कुपोषण कमी करण्यासाठी व अनेक कार्यक्रमांद्वारे गरीब आणि गरजूंच्या उन्नतीसाठी नेहमीच सर्वोत्तम सेवा करत असते. बालकांच्या सुआरोग्यासाठी आईचे स्तनपान खुप महत्वाचे असते.स्तनपानाच्या महत्त्वाबाबत वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेच्या वतीने आठवडाभर जनजागृती करण्यात येणार असून दि.३ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्तनपान सप्ताह जनजागृती रथाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

वर्ल्ड व्हिजन संस्था व आय.सी.डी.एस.भोकर यांच्या संयुक्त विद्यामाने मोबाईल व्हॅनद्वारे स्तनपानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.या उपक्रमातून भोकर तालुक्यातील सर्व गावांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे.ही बाब लक्षात घेऊन मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न होत आहे.या प्रचार रथाचा दि. ३ ऑगस्ट २०२२ रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी नांदेड जि.प.च्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील, सरपंच संघटनेचे माधव अमृतवाड, वर्ल्ड व्हिजन संस्थेचे व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू यांसह आदींची उपस्थिती होती.जनजागृती रथाच्या शुभारंभानंतर आ.अशोक चव्हाण यांनी ही संस्था कुपोषण कमी करण्यासाठी सरकारी विभागांशी समन्वय साधून काम करत असल्याची माहिती घेतली व मिळालेल्या माहितीत ही संस्था उत्तम कार्य करत असल्याचे त्यांना समजले आणि त्यांनी वर्ल्ड व्हिजन संस्थेच्या सेवाकार्याचे कौतुक केले. तसेच वर्ल्ड व्हिजन संस्थेच्या उदात्त सेवांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी वर्ल्ड व्हिजन संस्थेचे व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू यांनी गेल्या वर्षभरातील वर्ल्ड व्हिजन संस्थेने केलेल्या कामाचा संक्षिप्त अहवाल आ.अशोक चव्हाण यांना सुपूर्द केला.

वर्ल्ड व्हिजन संस्था ही या सप्ताहात अंगणवाडी केंद्रांमध्ये आईच्या स्तनपानाच्या महत्त्वावर कार्यक्रम आयोजित करत आहे.तर तालुक्यातील प्रत्येक गावात स्तनपान जनजागृती मोहीम व उपक्रम राबविला जात असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक अंगणवाडी सेविकांचे ही मोलाचे सहकार्य मिळत आहे.फ्रंटलाइन कामगारांसह ऑनलाइन वेबिनार आयोजित केल्या जात असून या कार्यक्रमात सी.डी.पी.ओ.राहुल शिवशेट्टे व सर्व पर्यवेक्षक सहभागी होत आहेत.तर वर्ल्ड व्हिजनच्या कर्मचाऱ्यांसह आदीजण हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !