Mon. Dec 23rd, 2024

भोकर उप.वि.अ.राजेंद्र खंदारे यांची उपमुख्यमंत्री कार्यालयात बदली

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : कर्तव्यदक्ष तथा ससमाजसेवी व्यक्तीमत्व म्हणून ख्याती असलेले भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय,सचिवालय मुंबई येथे अवर सचिव पदी बदली झाली असून सदरील बदलीचे आदेश दि.४ ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

जानेवारी २०१० मध्ये भोकर येथील आर.सी.सी.स्पन पाईप कारखानाच्या दोन खोल्यांमध्ये कार्यान्वित झालेल्या भोकर उपविभागीय कार्यालयाचे प्रथम उपविभागीय अधिकारी म्हणून दि.२१ जानेवारी २०१० रोजी राजेंद्र खंदारे यांनी यांनी पदभार स्विकारला होता.तर दि.२२ मार्च २०१३ रोजी त्यांची भोकरहून नांदेड वाघाळा महानगर पालिकेत उपायुक्तपदी बदली झाली होती.दरम्यानच्या काळात त्यांनी एक कर्तव्यदक्ष तथा समाजसेवी व्यक्तीमत्वाचे अधिकारी म्हणून जनमानसात त्यांनी आगळी वेगळी छाप सोडली होती. तद्नंतर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांची भोकर येथे दि.१० ऑगस्ट २०२० रोजी त्यानी दुसऱ्यांदा भोकर उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली व दि.१२ ऑगस्ट २०२० रोजी भोकर उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्विकारला व आज दि.४ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय, सचिवालय मुंबई येथे अवर सचिव (सह सचिव / उप सचिवांचे स्वीय सहायक, लघुलेखक यांचे पद अवर सचिव पदामध्ये रुपांतरीत / श्रेणी उन्नत करुन) या पदावर बदली झाली असल्याचे आदेश मंत्रालयीन अवर सचिव दे.सी.भुग यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले आहेत.सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय क्र. एमआयएन-१२२२/प्र.क्र. १८०/ २१,दि. २५ जुलै २०२२.कार्यालयीन आदेश संदर्भाधिन शासन निर्णयान्वये निर्माण केलेल्या सावधि पदावर उपमुख्यमंत्री कार्यालयात त्यांच्या सेवा विषयक माहिती व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्राच्या तसेच वित्त विभागाच्या मान्यतेच्या अधिन राहून दि.२६ जुलै २०२२ (म.पू.) रोजी पासून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे.तर त्यांच्या रिक्त जागी कोण येणार आहेत हे अद्याप तरी समजले नाही.परंतू प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.

नुतन पदभार स्विकारण्यासाठी राजेंद्र खंदारे मुंबईला रवाना होतांना तहसिलदार राजेश लांडगे, मंडळ अधिकारी महेश वाकडे, तलाठी संजय खेडकर व आदीजण

शासकीय सेवेतून लोकसेवेस प्राधान्य देणारे समाजसेवी व्यक्तिमत्व असलेले शिस्तप्रिय व कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांची ख्याती भोकर उपविभागातील सर्वसामान्यांत आहे.आपल्या सरकारी वाहनास राजेंद्र खंदारे यांनी चलतं फिरतं कार्यालयच केलं होतं.कार्यालयीन वेळेत व वेळेव्यतिरीक्त च्या कालावधीत कोणत्याही नागरीकाचे काम अडू नये याची काळजी घेऊन त्यांचे काम व्हावे यासाठी ते कामाचे दप्तर व शिक्के सोबतच घेऊन फिरायचे.फावल्या वेळेत ते दप्तर सोडायचे व काम चालूच असायचे.शहरी असो वा ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला थेट कार्यालयात जाऊन भेटून आपले काम सांगण्याची कुठलीच अडचण नव्हती.पानंद रस्ते,वनराई बंधारे,शेततळे,वृक्षा रोपण,बेटी बचाव अभियान,पाणी आडवा पाणी जिरवा, व्यसन मुक्ती,ग्रामस्वच्छता अभियान,कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी अहोरात्र कष्ट घेणे,अशा अनेक लोकाभिमूख उपक्रमांत त्यांचा मोठा वाटा होता.सर्वसामान्य नागरीकांपासून ते गाव स्तरावरीलसरपंच,तलाठी,ग्रामसेवक, शिक्षक,पोलीस पाटील,स्वस्त धान्य दुकानदार,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,अशा वर्कर्स,विद्यार्थी,पत्रकार आदीं सोबत त्यांचा थेट संपर्क असायचा.त्यामुळे विकासकामांत नेहमीच प्रगती असायची.शाळकरी मुलांच्या जात प्रमाणपत्रांबाबद तर त्यांनी अतिशय अभिनव उपक्रम राबविला.शाळास्तरावर त्यांनी जात प्रमाणपत्र दिली व विद्यार्थ्यांना होणारा नाहक त्रासातून मुक्त केले.याच बरोबर भोकर शहराच्या विकासात्मक कामांतल आलेले अडथळारूपी अतिक्रमणे हटविण्याचे काम ही त्यांनी केले. तसेच स्मार्ट व्हीलेज उपक्रम यशस्वीतेसाठी गावातील नाल्यांची सफाई ही देखील त्यांनी केली आहे.याच बरोबर नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणांना स्वतःचा जीव धोक्यात घालून पुरात उतरुन जीवनदान देणे असो वा नदी,नाला पार करुन गुडघाभर चिखल तुडवित तांड्यावर जाऊन आजारी नागरीकांना उपचार सेवा पुरविणे असो,अशा सेवाभावी कार्याची छाप येथील सर्वसामान्यांच्या मनात कायम घर करुन राहणार आहे.तर गौण खणिज व रेती तस्करांचे कर्दनकाळ म्हणून सर्वपरिचित असलेल्या या अधिका-याची बदली झाल्याने हे लोक सुटकेचा श्वास सोडणार आहेत. दि.१ ऑगस्ट २०२२ रोजी ‘महसूल दिनी’ उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. एकणूच त्यांच्या त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेऊन पदोन्नतीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात बदली झाली आहे.त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा नक्कीच राज्यास फायदा होणार आहे.त्यांची पदोन्नती झाल्याबद्दल बद्दल संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराकडून मनापासून अभिनंदन व त्यांच्या हातून अशीच मानवसेवा घडो यासाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !