Sun. Dec 22nd, 2024

भोकर नगर परिषद : आता उत्सुकता नगराध्यक्ष कोण याची ?

Spread the love

भोकर नगर परिषदेतील प्रभाग आरक्षण सोडतीत ११ महिलांत ३,तर ११ पुरुषांत २ अशा एकूण ५ ओबीसींचा नव्याने झाला समावेश

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकीत ओबीसींचे राजकीय आरक्षण बहाल करण्यात आले आहे.त्या अनुशंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने आज दि.२८ जुलै रोजी भोकर नगर परिषदेच्या प्रभागांतील ओबीसी नगर परिषद सदस्यांसाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून २२ नगर परिषद सदस्य संख्या असलेल्या या नगरपरिषदेतील ११ महिलांत ३,तर ११ पुरुषांत २ अशा एकूण ५ ओबीसींचा (नागरिकांचा मागास प्रवर्ग) नव्याने समावेश झाला आहे.तर जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने या पदासाठीचे आरक्षण कोणास सुटणार आहे ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

१९ नगर परिषद सदस्य संख्या असलेल्या भोकर नगर परिषद सदस्य मंडळाचा कार्यकाळ दि.९ मे २०२० रोजी संपला. तेंव्हापासून आजतागत नगर परिषदेचा कार्यभार प्रशासकांच्या हाती आहे.दरम्यानच्या कालावधीत कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण उपाय योजना राबविण्यांतर्गत तब्बल २ वर्ष गेले.तसेच वार्ड आरक्षण रचनेत बदल होऊन प्रभाग रचना झाली.यात ११ प्रभाग करण्यात आले व वाढत्या लोकसंख्येच्या आधारे २२ नगर परिषद सदस्य संख्या करण्यात आली.या २२ नगर परिषद सदस्यांसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत दि.१३ जून २०२२ रोजी भोकर नगर परिषदेत जाहीर करण्यात आली.परंतू यात ओबीसींचा समावेश मात्र नव्हता.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे प्रकरण मा.सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट होते.त्या खटल्याचा निकाल काही दिवसांपुर्वीच लागल्याने राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींचा त्या प्रभाग आरक्षणात समावेश करावा असे आदेशित केले होते.

त्या आदेशानुसार दि.२८ जुलै २०२०२ रोजी सकाळी १०:०० वाजता भोकर नगर परिषदेच्या नुतन इमारतीत प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे व भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्या उपस्थितीत भोकर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक -२०२२ अनुशंगाने नगर परिषदेच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,व सर्वसाधारण(महिला) आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला.यात ओबीसींच्या समाविष्ठतेने प्रभाग आरक्षण सोडत घेण्यात आली.अनुसूचित जाती महिला २,अनुसूचित जाती सर्वसाधारण १,आणि अनुसूचित जमाती महिला १ अशा प्रकारे एकूण ४ नगर परिषद सदस्यांचे प्रभाग निहाय आरक्षण पुर्वीप्रमाणेच कायम ठेण्यात आले असून उर्वरित १८ नगर परिषद सदस्यांत ओबीसी राखीव आरक्षणाचा समावेश करण्यात आला आहे.यात ३ महिला व २ पुरुष(सर्वसाधारण) अशा एकूण ५ सदस्यांचा समावेश आहे.ते प्रभाग निहाय…प्रभाग क्र.१ मध्ये १ अ- ना.मा.स. सा.(पुरुष),प्रभाग क्र.३ मध्ये ३ अ-ना.मा.स.सा.(पुरुष), प्रभाग क्र.६ मध्ये ६ अ-ना.मा.प्र.स्त्री(महिला),प्रभाग क्र.८ मध्ये ८ अ-ना.मा. प्र.स्त्री(महिला),प्रभाग क्र.९ मध्ये ९ अ-ना.मा.प्र.स्त्री (महिला) असे असून पुर्वीच्या सर्वसाधारण महिला राखीव प्रभागातील ३ महिला व २ पुरुषांचे आरक्षण कमी झाले आहे.

ओबीसी आरक्षणाचा गुंता आता सुटल्याने हिरमुसलेल्या इच्छुक ओबीसी उमेदवारांत नवचैतन्य निर्माण झाले असून सार्वत्रिक निवडणूकीच्या घोषणेची प्रतिक्षा सर्व पक्षिय इच्छूक उमेदवार करत आहेत.तर भोकर नगर परिषद अस्तित्वात आल्यापासून ४ नगराध्यक्ष हे नगर परिषद सदस्यांतून निवडले गेले.त्यात पहिला नगराध्यक्ष अनुसूचित जातीचा,दुसरा नगराध्यक्ष सर्वसाधारण, तिसरा नगराध्यक्ष अनुसूचित जमातीचा व चौथा नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला असा समावेश आहे.परंतू आता नगराध्यक्ष हे जनतेतून निवडण्याचा निर्णय झाल्याने नुतन नगराध्यक्ष कोणत्या आरक्षण प्रवर्गातील असणार आहे ? आणि त्यासाठीचे आरक्षण कधी जाहीर होईल याकडे ही अनेक दिग्गज इच्छूकांचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !