Mon. Dec 23rd, 2024

भोकर तालुक्यातील रहाटी बु.तलावात सापडला म्हैसा येथील तरुणाचा मृत्तदेह

Spread the love

अंबुइ प्रहार प्रतिनिधी

भोकर : तेलंगणा – महाराष्ट्र राज्य सिमेलगतच्या मौ. रहाटी बु.ता.मोकर येथील तलावात दि.२५ जुलै रोजी म्हेसा मंडळ तेलंगणा राज्य येथील एका तरुणाचा मृत्तदेह सापडला असून या प्रकरणी भोकर पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तेलंगणा – महाराष्ट्र राज्य सिमेलगत असलेल्या मौ.रहाटी ता.भोकर जि.नांदेड या गावच्या शिवारातील रहाटी तलावात दि.२५ जुलै २०२२ रोजी सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान एका पुरुषाचे प्रेत तरंगत असलेले शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.याबाबदची माहिती मौ.यहाटीचे पोलीस पाटील आशोक बागडे यांनी भोकर पोलीसांना दिली.यावरुन पो.उप.नि.दिगांबर पाटील व पोलीस कर्मचारी हे तात्काळ घटना स्थळी गेले आणि सदरील प्रेत तलावा बाहेर काढून रितसर पंचनामा केला.तसेच सदरील इसम कोण आहे ? याचा शोध घेतला असता त्याची ओळख पटली.त्या मयताचे नाव मतिनखान महेबूब खान पठाण(२५) मुळचा रा.ढाणकी ता.उमरखेड ह.मु.हैसा मंडळ जि.निर्मल तेलंगणा राज्य असे असून पाणी पिऊन येतो म्हणून तो दि.२४ जुलै २०२२ रोजी म्हैसा येथील घरुन गेला होता व घरी परतला नव्हता असे चौकशीत समोर आले आहे.उत्तरीय तपासणी नंतर सदरील. मयताचा मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तसेच आकस्मित मृत्यूची नोंद भोकर पोलीसात घेण्यात आली आहे.मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसून पुढील अधिक तपास पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.दिगांबर पाटील हे करत आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !