भोकर तालुका : इयत्ता १० वी चा निकाल ९६.२९ टक्के
तालुक्यात सावित्रीच्या लेकींचाच बोलबाला -कु.प्रिया सादुलवार व कु.श्रावणी तुप्तेवार या दोघीं ९८.२० टक्के समान गुण घेऊन ठरल्या अव्वल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : माध्यमिक शालांत परीक्षा मार्च- एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल दि.१७ जून रोजी घोषित झाला असून यात भोकर तालुक्याचा एकूण निकाल ९६.२९ टक्के लागला आहे.तर सदरील निकालात मुलांपेक्षा मुलींनीच मोठी बाजी मारली असल्याने सावित्रीच्या लेकींचाच बोलबाला झाला असून तालुक्यात अव्वल ठरलेल्या कु.प्रिया गंगाधर सादुलवार व कु.श्रावणी निळकंठ तुप्तेवार या दोघींना ९८.२० टक्के असे समान गुण मिळाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
भोकर तालुक्यातील एकूण ३१ माध्यमिक शाळांतून १९४६ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली.या पात्र विद्यार्थ्यांपैकी एकूण १८६० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून यातील १७९१ विद्यार्थी परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.या नुसार तालुक्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी ९६.२९ आहे.तर यात विशेष प्राविण्यात ५२६,प्रथम श्रेणीत ८०३, द्वितीय श्रेणीत ३८१, व उत्तीर्ण ८१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.तालुक्यातील एकूण निकालात मुलींनी मोठी बाजी मारली असून विमल इंग्लिश स्कूल भोकरच्या कु.प्रिया गंगाधर सादुलवार व कु.श्रावणी निळकंठ तुप्तेवार या दोघींना ९८.२० टक्के असे समान गुण मिळवून तालुक्यात अव्वल स्थान पटकावले आहे.तर श्री शाहू महाराज हायस्कूल भोकर च्या श्रेयश रंजना श्रीनिवास कदम याने ९७.२० टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे.या विद्यार्थ्यांसह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गट शिक्षणाधिकारी एम.जी.वाघमारे,सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,प्राचार्य, मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख,शिक्षकवृंद, पालक व विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
तालुक्यातील एकूण ३१ शाळांपैकी १४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून उर्वरित शाळांचा निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.जि.प.हायस्कूल भोकर १००%,श्री शाहू महाराज हायस्कूल भोकर ९२.८७%, मदिनातुल उलूम हायस्कूल भोकर ९८.८०%,मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे हायस्कूल भोकर ९८.११%,सेकंडरी आश्रम शाळा भोकर ९४.५९%, सरस्वती विद्यामंदिर कन्या विद्यालय भोकर १००%,जि.प. हायस्कूल मातूळ ता.भोकर १००%,जि.प.हायस्कूल किनी ता.भोकर ९५%,जि.प. हायस्कूल पाळज ता.भोकर १००%,श्री गाडगेबाबा आदिवासी पो.बे.आश्रम शाळा सिताखांडी ता.भोकर १००%,कै.मोहनराव देशमुख विद्यालय भोसी ता.भोकर ९६.८०%,स्वा.से.भुजंगराव पाटील किन्हाळकर माध्यमिक विद्यालय रिठ्ठा ता.भोकर ९६.४२%,सिता माता माध्यमिक विद्यालय सोमठाणा ता.भोकर ९७.८२%,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय सोनारी ता.भोकर १००%, ज्ञान संवर्धन विद्यालय बोरगाव ता.भोकर १००%,शिवम शंकर माध्यमिक विद्यालय दिवशी(बु.)ता.भोकर १००%,कै. लक्ष्मणराव पाटील हस्सेकर माध्यमिक विद्यालय लगळूद ता.भोकर ९६.६१%,पोस्ट बेसिक आदिवासी आश्रम शाळा भोसी ता.भोकर १००%,माध्यमिक आश्रम शाळा साळवाडी ता.भोकर १००%,मिनूसाहेब श्राफ हायस्कूल हळदा ता. भोकर ७७.७७%, शिवाजी महाराज हायस्कूल हाडोळी ता. भोकर ९५.८३%, कै.ज. देशमुख गोरठेकर माध्यमिक विद्यालय पोमनाळा ता.भोकर ९१.३०%,राजश्री शाहू माध्यमिक विद्यालय भोकर ९४.११%,कै.लक्ष्मणराव घिसेवाड हायस्कूल भोकर ९५.०३%भगिरथीबाई माध्यमिक भोकर ९७.१४%,कै.व्यंकटराव देशमुख माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा बेंद्री ता.भोकर १००%,कै. शंकरराव चव्हाण आदिवासी आश्रम शाळा दिवशी(बु.) ता. भोकर ९२.८५%,कुसूमताई शंकरराव चव्हाण आदिवासी आश्रम शाळा भोकर १००%,वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय चिदगिरी ता.भोकर ८७.५०%,विमल इंग्लिश स्कूल भोकर १००%, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल भोकर १००% अशी आहे.
संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन आणि भावी यशासाठी खुप खुप शुभेच्छा!
🌹🌸🌹