उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन सण उत्सव शांततेत साजरे करा-राजेंद्र खंदारे
भोकर येथे शांतता समितीची बैठक संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कोरोना प्रादुर्भाव काळादरम्यान निर्बंधांमुळे सण उत्सवांवर बंदी होती,तर आता काही निर्बंध हटविल्याने मिरवणूकीस परवानगी मिळणार आहे.परंतू आगामी सण उत्सवांदरम्यानच्या काळात उन्हाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने आयोजकांनी मिरवणूकीत सहभागी होणा-या महिला,बालके यांच्या आरोग्याच्या काळजीत्सव उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सण उत्सव साजरे करा,अशा सुचना भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी दिल्या आहेत.भोकर येथे दि.८ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून ते बालत होते.
आगामी श्रीराम नवमी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,रमजान महिना व रमजान ईद अशा सण उत्वाच्या पार्श्वभूमीवर भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात दि.८ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजता उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली.यावेळी भोकरचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड,तहसिलदार राजेश लांडगे,महा वितरणचे उप अभियंता ए.एस.शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीचे आयोजक पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी प्रास्ताविकात सण उत्सवांदरम्यानच्या काळात साजरे होणाऱ्या उपक्रम व कार्यक्रमांसंबंधी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे वाचन केले.तसेच सदरील नियम अटींचे पालन करावे असे आवाहन केले.याच बरोबर या दरम्यान कोणी नियम भंग करण्याचा व उपक्रम,कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर त्या अपप्रवृत्तींविरुद्ध आम्ही योग्य ती कारवाई करु,असे आश्वाशित केले.यावेळी बैठकीस मार्गदर्शन करतांना तहसिलदार तथा भोकर नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेश लांडगे म्हणाले की,सण उत्सवांदरम्यानच्या काळात आवश्यक असलेल्या सोयी,सुविधा पुरविण्यांसंबंधी आम्ही काळजी घेऊ व त्या उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु असे म्हटले आहे.तर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड म्हणाले की,भोकर शहर व तालुका हा शांतता प्रिय असून येथील नागरिक कायदा,शांतता आणि सुव्यवस्था आबाधीत ठेवणारे असल्याने आगामी सण उत्सव ते शांततेत पार पाडणाचरच आहेत,याची मला खात्री आहे.तसेच पुढे बोलतांना राजेंद्र खंदारे म्हणाले की,भोकर व तालुक्यातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तचे उपक्रम,कार्यक्रम अगदी नियोजनबद्ध,मोठ्या आनंदोत्सवात आणि शांततेत संपन्न केली आहेत.त्याच प्रमाणे आगामी सण उत्सव ही संपन्न होतीलच अशी खात्री आहे.तरी कायद्याचे उल्लंघन न होता हे सण उत्सव आपण साजरे करावेत असे आवाहन ही त्यांना यावेळी केले.

सदरील बैठकीत शांतता समिती सदस्य,जयंती मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी,मश्जिदीचे कार्यभार विश्वस्थ व आदींनी आवश्यक त्या सुचना मांडल्या.तर या सुचना ऐकून घेऊन त्या सोडविण्यात येतील असे आश्वासन उपस्थित अधिका-यांनी दिले.या बैठकीस माजी सभापती तथा माजी उपनगराध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष साहेबराव मोरे व पदाधिकारी,श्रीराम जन्मोत्सव समितीचे अजय टाक,सोहम शेट्टे,अनिल कापसे,नंदू -याकावार,मश्जिद विश्वस्थ सज्जाद भाई इनामदार,सय्यद जुनेद,ॲड.शेख मुजाहेद,जुनेद पटेल,शांतता समिती सदस्य संपादक उत्तम बाबळे,भिमराव दुधारे,मंसूर पठाण,यांसह सामाजिक कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी,पोलीस पाटील,जयंती मंडळाचे पदाधिकारी,शांतता समितीचे सदस्य,महिला कार्यकर्त्या,पत्रकार बांधव आदींची उपस्थिती होती.