‘स्मार्ट व्हीलेजसाठी’ भोकर तालुक्यात कलापथकाद्वारे होत आहे जनजागृती
वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे हा उपक्रम
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील गावे स्वच्छ व सुंदर व्हावेत, बालकांचे आजार,पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, एकूणच गाव स्मार्ट व्हिलेज व्हावे यासाठी आदी विषयावर भोकर तालुक्यात लोकजागृती पथकाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून हा उपक्रम वर्ल्ड व्हिजन इंडिया या संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे.
भोकर तालुक्यात वर्ल्ड विजन इंडिया या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्य हाती घेण्यात आले असून महिला व बालकांसाठी महत्त्वाचे कार्य केल्या जात आहे.तसेच बालविवाह रोखणे,कुपोषित बालकांसाठी, अंगणवाडी शाळा व आरोग्य साठी,दिव्यांग बालकांसाठी,शेतकरी व गरीब कुटुंबांसाठी आर्थिक मदत देऊन काम करण्यात येत आहे.वर्ल्ड व्हिजन इंडिया भोकर चे प्रकल्प अधिकारी श्याम बाबू पट्टापु यांच्या संकल्पनेतून गावे ही स्मार्ट व्हिलेज व सुंदर बनविण्याच्या दृष्टीने, बालकांचे आजार,स्वच्छ पिण्याचे पाणी हा विषय घेऊन लोकजागृती कला पथक भोकर च्या वतीने गावागावात जनजागृती करण्यात आली आहे.या कला पथकाचे प्रमुख बी.आर.पांचाळ यांनी गीते,पोवाडे व संवादाच्या माध्यमातून गावाची स्वच्छता,संघटन,पिण्याचे स्वच्छ पाणी, बालकांचे आजार,कुपोषण मुक्ती,वृक्षारोपण,बालविवाह प्रतिबंध,स्त्री भ्रुणहत्या आदी विषयावर प्रभावी जनजागृती केली.लामकानी,सायाळ, रायखोड,धारजनी,जाकापूर,सावरगाव मेट,मोघाळी,सावरगाव माळ, आधी गावामधून कला पथक सादर करण्यात आले. महिला,बालक, विद्यार्थी,पुरुष,बालिका,युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या कलापथकामध्ये शाहीर रमेश नार्लेवाड,गंगाधर बिरदे,श्रीनिवास नार्लेवाड,जयश्री पोत्रे,गंगाधर सुनकेवार,दिगंबर डोंगरे यासह आदींचा सहभाग होता.