लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार;भोकर पोलीसात एका विरुद्ध गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील एका गावच्या १९ वर्षीय तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध भोकर पोलीसात दि.१२ मार्च रोजी बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका १९ वर्षीय तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून गेल्या दोन महिन्यापासून तिच्या घरी व गावातील मंदिर परीसरातील लिंबाच्या झाडा जवळ एका तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केला.तसेच दि.११ मार्च २०२२ रोजी दुपारी ४:०० वाजताच्या दरम्यान ती शौचास गेली असता त्याने तिला गाठले व तिचा हात धरुन तु माझ्या सोबतच लग्न कर असे म्हणून अंगास झटापट करुन विनयभंग केला.
दि.१२ मार्च २०२२ रोजी पिडीतेने कुटूंबीयांसोबत भोकर पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या प्रकाराबाबद उपरोक्त आशयाप्रमाणे रितसर फिर्याद दिली.यावरून गुरनं ८६/२०२२ कलम ३७६(२)(एन.),३५४, ३५४(अ) भादवि प्रमाणे नितीन गुलाबराव जाधव रा.जांभळी ता.भोकर या विरुद्ध बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला असून पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास महिला पो.उप.नि. राणी भोंडवे या करत आहेत.