माय सावित्री…

उत्तम बाबळे,संपादक
साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण
माय सावित्री….(कविता)
माई तू घेतले किती अंगावर शेन
म्हणून आम्ही जाणलो संविधान
तूच केला नष्ट स्त्री-पुरुष जातिभेद
तुझ्यामुळे मिटले समाजातील असमानतेचे वाद
तुझे उपकार आहे आमच्या ध्यानी
आम्ही शिकलो शिक्षणाची वाणी
तुझ्या मुळेच आम्ही झालो ज्ञानी
विषमतावाद्यांनी काय केली होती तुझी अवस्था
काय होती ती मुलीची जाती व्यवस्था
आज आहे आम्हाला तुझी जाण
तुझंच गातो आम्ही जयगाण
आज ही आहे तुझी समाजात शान
किती वाटते आमचे अस्तित्व छान
तुझ्या कामगिरीला माझा सलाम
तुझ्यामुळे आज स्त्री नाही गुलाम

कवयित्री…
माधवी चौकटे,औरंगाबाद