Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे यांनी किनवट नगर परिषदेकडे केली मागणी

अंबुज प्रहार प्रतिनिधी

किनवट : किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैक परीसरातील दुकानांवरील फलकांवर(पाट्यांवर) ‘शिवाजी चाैक’ आणि ‘आंबेडकर चाैक’ असा महापुरुषांच्या नावांचा एकेरी उल्लेख लिहण्यात आला असून ‘ती’ फलके(पाट्या) तात्काळ हटवून त्या फलकांवर महापुरुषांची पुर्ण नावे सन्मानपुर्वक लिहून दुकानांवर लावावित.तसे न लावणा-या दुकानांवर नगर परिषद प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन किनवट तालुक्यातील समाजसेवी युवा पत्रकार तथा भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे यांनी दि.२८ फेब्रुवारी रोजी दिले असून ही कारवाई लवकरात लवकर न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा त्यांनी दिला आहे.

आजच्या काळात प्रत्येकालाच जाण आहे की,या महाराष्ट्राच्या मातीत अनेक राजे महाराजे व अनेक साधुसंत तसेच महापुरुष आपल्या जनतेच्या कल्याणासाठी झटून जनतेसाठी आपले आयुष्य समर्पुण गेले आहेत.त्यांच्या पश्चात आपण त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या करतोत,पुतळे उभारतोत.परंतू त्यांचे विचार मात्र आचरणात आणत नाहीत.तेंव्हा किमान आपल्या आजूबाजूच्या दुकानांवर दुकानांचे नाव असलेल्या फलकांवर(पाट्यांवर) किंवा एखाद्या छापील पत्ता असलेल्या कागदावर का होईना त्या महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख होणे हे कुठल्याही समजदार,सुसंस्कृत व्यक्तीला, समाजाला न पटणारा आहे.तेंव्हा किनवट शहरातील ”छत्रपती शिवाजी महाराज चौक” आणि ”डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक” या परिसरातील काही व्यापारी बांधवांनी त्यांच्या दुकानावरील फलकांवर ‘शिवाजी चौक’ व ‘आंबेडकर चौक’ असा महापुरुषांच्या नावांचा एकेरी उल्लेख करुन लिहलेली फलके पहावयास मिळतात, हे उचित नव्हे,तर एक प्रकारे महापुरुषांची विटंबना करण्यासारखे होय.

म्हणून ती फलके तात्काळ हटविण्यात यावित किंवा त्या फलकांवर ”छत्रपती शिवाजी महाराज चौक” आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक” असे सन्मानपुर्वक लिहून लावावित.ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडविला आणि ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान देऊन सर्वांना सर्वाधिकार दिले.अशा महापुरुषांच्या नावांचा एकेरी उल्लेख कदापिही होऊ नये,तरच ती खरी आदरांजली ठरेल.या उदात्त हेतूने पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांनी दि.२८ फेब्रुवारी २०२२ रोजी उचित कारवाई करण्यास्तव नगर परिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.

कोणत्याही जाती,धर्मातील,राज्यातील विविध भाषिकाला आपल्या श्रद्धास्थानी,प्रेरणास्थानी असणा-या महान व्यक्तींच्या नावांचा सन्मानपूर्वक उल्लेख व्हावा अशी अपेक्षा असते व तसा उल्लेख करण्यास कोणाचा विरोध असेल अशी अपेक्षा तर मुळीच नसते.असे असतांना किनवट शहरात हा विटंबनेचा प्रकार पहावयास मिळतो ही दुर्दैवी बाब आहे.म्हणून येत्या सात दिवसात त्या दुकानांच्या फलकावरील महापुरुषांच्या नावांचा एकेरी केलेला उल्लेख काढून टाकावा व नुतन फलकांवर सन्मानपूर्वक पुर्ण नावे लिहावित.अन्यथा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या कायद्यात राहुन,परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढवय्या पद्धतीने ती फलके आम्ही बदलू अशा इशाऱ्यासह कळकळीची विनंती पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांनी नगरपरीषद प्रशासनास आणि व्यापारी बांधवांनाही केली आहे.

नगरपरीषद प्रशासन छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य असा पुतळा लवकरच ऊभारणार असल्याची चर्चा शहरात जोर धरु लागलेली असतानाच या एकेरी नावाचा उल्लेख असलेल्या फलकांच्या प्रकरणाला नगर परिषद प्रशासन किती गांभीर्याने घेते ? याकडे  निवेदनकर्ते भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांच्यासह तमाम महापुरुष सन्मान प्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !