Sat. Jan 11th, 2025

आदर्श शिक्षक शंकर कुद्रे जिल्हास्तरीय गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

नांदेड : अभ्यासक्रम विकास विषय तज्ञ तथा एक अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून सर्व परिचित असलेले जि.प.प्रा.शाळा सांगवी(उमर)ता.देगलूर येथील शिक्षक शंकर कुद्रे यांना दि.२७ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२१ चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुरुगौरव पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी ( उमर ) ता.देगलूर जि. नांदेड येथील उपक्रमशील,विद्यार्थी प्रिय,एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व,विविध प्रशिक्षण देणारे तज्ञ मार्गदर्शक तथा साधनव्यक्ती,अभ्यासक्रम विकासासाठी विषय तज्ञ म्हणून ज्यांनी काम केले आहे.ते इंग्रजी विषयाचे गाडे अभ्यासक, साहित्यिक समीक्षक,प्रतिभावान व प्रतिभासंपन्न व्याख्याते, उत्कृष्ट सूत्रसंचालक,यू ट्यूब फेम इंग्लिश गुरू म्हणून त्यांची सर्वत्र ओळख असलेले तंत्रस्नेही,रशिया रिटर्न शिक्षक शंकर कुद्रे शेवाळकर यांच्या शैक्षणिक व विविध क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सन २०२१ च्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुरुगौरव पुरस्कारासाठी निवड केली.

दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी नांदेड येथे जि.प.च्या वतीने भव्य असा पुरस्कार वितरण सोहळा संपन्नक झाला.सदरील सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सा.बां.वि.मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची,तर अध्यक्षस्थानी जि.प.च्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर या होत्या.यावेळी आ.मोहनराव हंबर्डे,माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,शिक्षण सभापती संजय बेळगे,माजी शिक्षण सभापती माधवराव मिसाळे  गुरुजी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर,मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षाताई ठाकूर, शिक्षणाधिकारी( मा.) प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) सौ.सुविता बिरगे यांसह जिल्हा परिषदेचे सर्व सभापती व सदस्यांची उपस्थिती होती.

उपरोक्त सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन शंभर कुद्रे यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले.शंकर कुद्रे यांना या जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रातील सहकारी, विविध क्षेत्रातील मित्रगण व आदींनी अभिनंदन केले असून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !