औरंगाबाद येथे ‘मातंग अस्मिता चिंतन परिषद’ संपन्न
माजी राज्यमंत्री मधूकररावजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक एकीकरणातून लढा उभारण्यासाठी संपन्न झालेल्या या परिषदेत राज्यातील अनेक मान्यवरांनी घेतला सहभाग
उत्तम बाबळे,संपादक(अंबुज प्रहार)
औरंगाबाद : महाराष्ट्रातील मातंग व तत्सम वंचित जातींची सर्व स्तरांवर निरंतर होत असलेली उपेक्षा, सामाजिक समते संदर्भात राज्य सरकारची पक्षपाती भूमिका ही या जाती समुह बांधवांना सातत्याने दारिद्र्याच्या खाईत ढकलत आहे.सातत्याने होत असलेल्या अन्याय अत्याचार व सामाजिक न्यायाच्या योजनांचे वितरण करताना कोणत्याही समतावादी धोरणांची अंमलबजावणी होत नसल्याने अनुसूचित जातींमध्ये विकासात्मक विषमता निर्माण झाली आहे. याच बरोबर अनुसूचित जातीतील लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळणे ही गरजेचे असल्याने आरक्षणाचे वर्गीकरण अ,ब,क,ड व्हायला पाहिजे.उपरोक्त न्यायीक बाबींसाठी लोकशाही मार्गाने तीव्र लढा उभारण्याची आज आवश्यकता आहे. यासाठी मातंग व तत्सम जाती सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे.याच अनुशंगाने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव( राज्यमंत्री दर्जा ) मधुकररावजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी औरंगाबाद येथे “मातंग अस्मिता चिंतन परिषद” संपन्न झाली असून पुढील लढ्याची दिशा ठरविण्यासाठी एक “सुकाणू समिती ” गठीत करण्यात आली आहे.
सरकार व राजकीय पक्षांनीही मातंग समाज व तत्सम वंचित जाती समाजाला उपरोक्त बाबींनी उपेक्षीत ठेवले आहे.या समाजाच्या घटनात्मक हक्काचे रक्षण करण्यात व सामाजिक न्याय,समता,बंधूता अबाधित ठेवण्यात ही ते असमर्थ ठरले आहे.याच बरोबर मातंग समाज व तत्सम जातींच्या न्याय हक्काचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात आणि समाजाच्या अस्मितेचा सन्मान करण्यात ही ते अपयशी ठरले आहे.या सर्व बाबी लक्षात घेता या विखुरलेल्या समाजाची अस्मिता जागृत करने,चिंतन करणे व लढा उभारणे गरजेचे आहे.याच अनुषंगाने विखुरलेल्या मातंग समाजासह तत्सम जातींना संघटित करण्यासाठी एक अभ्यासू नेतृत्व म्हणून सर्व परिचित असलेले साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव( राज्यमंत्री दर्जा ) मधुकररावजी कांबळे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या नेतृत्वात दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी औरंगाबाद येथे “मातंग अस्मिता परिषद” संपन्न झाली.
मधुकररावजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या सदरील चिंतन परिषदेस प्रा.डॉ.चांगदेव कांबळे ( Director, Kiocl.Govt of India,सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र ), प्रा.डॉ.अंबादास सकट( ज्येष्ठ विचारवंत/ साहित्यिक ),प्रा.संजय गायकवाड (ल.स.क.म.प्रदेशाध्यक्ष ),ॲड.विक्रम गायकवाड (High court मुंबई ),सतिश कावडे (अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,संस्थापक अध्यक्ष,मराठवाडा),राजेश अहिव ( माजी संचालक वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ,महाराष्ट्र शासन मुंबई,नागपूर विभाग),इंजि.समाधान साठे (अमरावती विभाग ),रमेश कांबळे ( महाराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्कार प्राप्त,नाशिक विभाग ) तसेच इतर मान्यवरांनी विविध विषयांवर संबोधित केले.
तसेच सामाजिक ऐक्याच्या भूमिकेचे समर्थन करताना संजय इंचे(मिशन बार्टी ),भारत जाधव (माजी,शिवसेना जिल्हा प्रमुख जालना),कैलास पाजगे (युवा नेते जालना), ॲड.बलराज कांबळे(मुंबई उच्च न्यायालय),रमेश रोकडे( मुंबई ),देवेंद्र खलसे (उस्मानाबाद ),राजेंद्र अडागळे (उल्लासनगर,कल्याण ),प्रकाश मुराळकर (माजी संचालक वसंतराव नाईक महामंडळ म.राज्य,नांदेड),संजय जामठीकर (परभणी ),सुनील बनसोडे (सांगली ),इंजि.एस. पी.चव्हाण (लातूर ),प्रा.महादेवराव तेलंग (वर्धा ),भगवान वैरागर (पुणे ),ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक अण्णा धगाटे (पुणे),यांसह आदीनी ऑनलाइन पद्धतीने सहभागी होऊन महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
तर या चिंतन परिषदेस संजयबाबा गायकवाड (जालना ),रतन लांडगे (सुभाषचंद्र बोस संघटना ),मारोतीराव तुपे (राष्ट्रीय लहुशक्ती ),उद्धव पारधे (बुलढाणा)संजय कांबळे (वाशिम), सतिश चव्हाण (औरंगाबाद),राम सुतार,किसन लांडगे (राष्ट्रीय लहुशक्ती जालना ),परिमलदादा कांबळे (राष्ट्रीय लहुशक्ती युवा प्रमुख),अमरदीप पोटफोड (युवा सरचिटणीस,मीडिया संयोजक ),यांसह राज्यातू आलेल्या आदी निमंत्रित मान्यवरांची आणि समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिका-यांची यावेळी उपस्थिती होती.
सर्व सहभागींचे विचार व चर्चेअंती पुढील कार्यास गती देण्यासाठी या परिषदेची एक “सुकाणू समिती ” स्थापन करण्यात आली.या समितीमध्ये उपस्थित असलेल्या काही कुशल संघटक व कार्यक्षम नेत्यांची निवड करण्यात आली. तसेच अन्य काही महत्वांच्या नेत्यांचा या समितीत पुढील बैठकीपूर्वी समावेश करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून सामाजिक न्याय तथा समतेच्या आधारावर अनुसूचित जातीचे आरक्षणाचे वगीकरण करण्यात यावे यासाठी व समाजहितासाठी सामाजिक नेत्यांनी एकत्र यावे यासाठी यावेळी आवाहनही करण्यात आले.
मधुकररावजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या चिंतन परिषदेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागरकुमार रंधवे (नवी मुंबई ) यांनी केले.तर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सुखदेव पेटारे(जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय लहुशक्ती औरंगाबाद),अशोकराव कांबळे (उपाध्यक्ष) आणि इतर पदाधिका-यांनी केले.