राष्ट्रीय राजपूत करणी सेनेत सौ.गीता ठाकूर यांचा प्रवेश
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : शासकीय विश्रामगृह नांदेड येथे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची दि.२० फेब्रुवारी रोजी एक महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली.यावेळी नांदेड येथील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.गीता शंकर सिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेत प्रवेश केला असून भावी सेवाकार्यासाठी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
संपन्न झालेल्या बैठक समयी श्री.राजपूत करणी सेना च्या मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख सौ.पूजा गणेशसिंह बिसेन,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मीना हजारी,शहराध्यक्ष महेश ठाकूर,नांदेड येथील निर्भिड संपादक साहेबराव कोलंबिकर,पत्रकार मारोती शिकारे,पत्रकार शंकर सिंह ठाकूर यांसह आदींची उपस्थिती होती.
सौ.पूजा गणेशसिंह बिसेन,मीना हजारी यांनी सौ.गीता ठाकूर यांचे आई दुर्गा देवीची ओढणी,पुष्पहार,पुष्गुच्छ देऊन स्वागत केले व श्री.राजपूत राष्ट्रीय करणी सेनेत प्रवेश दिला.सौ.गीता ठाकूर यांनी करणी सेने मध्ये प्रवेश केल्याने परिवार व अनेक सामाजिक संघटनांनी त्यांचे स्वागत केले आणि भावी सेवाकार्यासाठी विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.