श्रीनिवास पाटील बिल्लरवार याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन
भोकर येथील जेष्ठ राजकीय व सामाजिक नेते बाबूराव पाटील आंदबोरीकर(मामा) यांना पुत्रशोक
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : येथील प्रसिद्ध व्यापारी तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते व सामाजिक नेते बाबूराव पाटील बिल्लरवार आंदबोरीकर यांचे द्वितीय चिरंजीव श्रीनिवास पाटील बिल्लरवार आंदबोरीकर(४०) यांचे दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० वाजताच्या दरम्यान ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर रात्री १०:०० वाजता वैकुंठधाम हिंदू दहनभुमी,भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दि.४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान राहत्या घरी गंदेवार कॉलनी,भोकर येथे श्रीनिवास बाबूराव पाटील आंदबोरीकर यांना थोडे अस्वस्त वाटू लागले.ही बाब त्यांनी कुटूबियांना सांगितली.यामुळे त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ नेले.परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे कुटूंबीयांना सांगितले.यानंतर भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
भोकर येथील उच्च शिक्षित युवा कार्यकर्ते,शांत स्वभावी व मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित असलेल्या श्रीनिवास बाबूराव पाटील आंदबोरीकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली दुःखद निधन झाल्याने कुटूंबीय,नातेवाईक व मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील यांचे ते भाचे आणि डॉ.बालाजी पाटील बिल्लरवार यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन मुले,भाऊ,भावजय,५ बहिणी,मेहुणे असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर दि.४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री १०:०० वाजता वैकुंठधाम हिंदू दहनभुमी,भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै.श्रनिवास पाटील आंदबोरीकर यांच्या परिवाराच्या दु:खात संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवार सहभागी असून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली!