Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) आयोजित केलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य पात्रता(Set Exam) परीक्षेत ६.६४ टक्के विद्यार्थी उतीर्ण

अंबुज प्रहार प्रतिनिधी

नांदेड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) आयोजित केलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेचा (Set Exam ) निकाल दि.२८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून या परिक्षेत भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्या कन्या कु.प्रिती गोपाळराव रांजणकर या घवघवीत यश संपादनाने उतीर्ण झाल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) आयोजित केलेल्या प्राध्यापक पदासाठीची ३७ वी महाराष्ट्र राज्य पात्रता(Set Exam) परीक्षा दि.२६ स्पटेंबर २०२१ रोजी पार पडली होती.या परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि.२८ जानेवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. यावेळी ७९७७४ उमेदवारांनी सदरील सेट परीक्षा दिली होती. यापैकी ६.६४ टक्के विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा उतीर्ण केली आहे.ही सेट परीक्षा उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५,२९७ आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात आली होती.मास्क,सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं पालन करत पार पडलेल्या परिक्षेत मुंबई आणि पुण्यात विद्यार्थ्यांची उपस्थीती कमी असल्याचे समोर आले आहे.

या परीक्षेत भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळराव रांजणकर यांच्या कन्या कु.प्रिती गोपाळराव रांजणकर या उतीर्ण झाल्या आहेत.यापूर्वी कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांनी दयानंद महाविद्यालय लातूर येथे कला शाखेतील एम.ए.विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यांनी कला शाखेच्या एम.ए.परिक्षेत ८७.८२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.विशेष बाब म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड मधून त्यांना एम.ए. इंग्रजी या विषयात सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.सदरील यशानंतर आता सेट परीक्षेत ही त्यांनी यश संपादन केले असल्याने त्यांच्या या यशाचे अनेकांतून कौतुक होत असून विविध स्तरातून अभिनंदन ही होत आहे.संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसह कु.प्रिती गोपाळराव रांजणकर यांचे अगदी मनापासून खुप खुप अभिनंदन व भावी यशासाठी शुभेच्छा !


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !