शासनकर्त्यांच्या दळभद्री धोरणामुळे कृषि संस्कृतीचा कणा मोडला-डॉ.सुर्यप्रकाश जाधव
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : स्वातंत्र्यापुर्वी परकीयांच्या सत्तेमुळे अन स्वातंत्र्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे भारतीय कृषि संस्कृतीचा कणाच मोडला. अन स्वातंत्र्या नंतर शेतीवर अवलंबून असणारे अगणित शेतकरी आत्महत्तेचा मार्ग स्विकारतांना दिसत आहेत,असे मत डॉ.सुर्यप्रकाश जाधव यांनी व्यक्त केले.ते दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर च्या वतीने संपन्न होणाऱ्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाच्या’ निमित्त संपन्न होणाऱ्या ऑनलाइन व्याख्यानमालेत बोलत होते.
या व्याख्यानात डॉ.जाधव यांनी ग्रामीन साहित्य चळवळीत योगदान देणाऱ्या अनेक प्रसिद्ध लेखक विचारवंतांच्या साहित्यकृतीचा उहापोह केला.या प्रसंगी अध्यक्षीय समारोपात मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. जाधव जे.टी.यांनी शेतकरी, शेतमालक समृध्द झालाच पाहिजे,पण त्याच बरोबर शेतमजूर सुध्दा सन्मानाने समृद्ध झाला पाहिजे.कसेल त्याची जमीन मग नसेल त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला.या प्रसंगी सुरेख सुत्रसंचंलन प्रा.डॉ.राजेंद्र चौधरी यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अरविंद चौधरी,डॉ.नागेश ढोले,प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले.